अकोट: अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत आज दि, 10/3/2022 रोजी विशेष पथक अकोला यांना खात्रिलायक खबर मिळाली कि एक इसम मक्रमपूर मार्गे उमरा इथे अवैध रित्या दारूची विक्री करीत दुचाकि गाडीवर येणार आहे. अश्या खात्री लायक बातमी वर तुकाराम मंदिर जवळ नाकाबंदी करून थांबवले असता त्याने आपले नाव गोविंदा नागोराव इंगळे वय 32 वर्ष रा उमरा असे सांगितले त्याचा कडे mh 30ar 3257 गाडी तसेच कोकण देशी दारू 999 कंपनीचे 160 नग 4,800 रु. तसेच दुचाकी गाडी कीं. अं.50,000 रु असा एकूण 59,800रु चा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी विरुद्ध महा. दारूबंदी कायदा कलम 65 ई कायदयाचे अन्वये पो. स्टे.अकोट ग्रामीण येथे गुन्हा नोंदविन्यात आला आहे.
तसेच दुसरी कारवाई गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली की ग्राम उमरा येथील राहुल रमेश थोरात हा त्याच्या गायवाड्यात दारू अवैध रित्या विक्री करिता आहे.अश्या खात्रीलायक बातमी वर सदर ठिकाणी जाऊन रेड केली असता त्याच्या गायवाड्यात पिशवीत पाहाणी केली असता त्यात कोकण देशीदारू 999 चे 50 नग 1500रु. चे मिळून आले… त्याचे हे कृत्य म. दा. अधी. अन्वये होत असल्याने त्यांचे विरुद्ध पो. स्टेशन अकोट ग्रामीण येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.पो.अधीक्षक सा. जी. श्रीधर सा.अपर पो. अधीक्षक एम.राऊत मॅडम,यांच्या मार्गदर्शन खाली पो. नि. विलास पाटील साहेब यांच्या विशेष पथकाने केली.