• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त (पुर्व) परिक्षेसाठी 35 केंद्रांवर व्यवस्था; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

Our Media by Our Media
February 26, 2022
in Featured, अकोला, शिक्षण
Reading Time: 1 min read
86 1
0
nima arora collector jilhadhikari akola
13
SHARES
624
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.26 महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे दुय्यम सेवा संयुक्त (पुर्व) परिक्षा रविवार दि.26 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे. अकोला शहरातील एकूण 35 उपकेंद्रावर सकाळी 11 ते 12 या वेळेत ही परीक्षा होणार आहे. ही परीक्षा शांततेच्या वातावरणात पार पाडावी यासाठी सर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटल्यानुसार परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा ते सायंकाळी आठ यावेळात सर्व 35 परीक्षा केंद्राच्या आतील संपूर्ण परिसरात व केंद्राचे बाहेरील लागून 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

उपकेंद्राचे नाव व पत्ता :

  1. शिवाजी आर्ट, कॉम र्स अन्ड सायन्स कॉलेज मोर्णा बिल्डींग, शिवाजी पार्क, अकोट रोड अकोला.
  2. शिवाजी आर्ट, कॉमर्स अन्ड सायन्स कॉलेज पुर्णा बिल्डींग, शिवाजी पार्क, अकोट रोड अकोला.
  3. खंडेलवाल ज्ञानमंदीर कॉन्व्हेंट गोरक्षण रोड.
  4. मांगीलालजी शर्मा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वानखडे नगर, डाबकी रोड, अकोला
  5. जागृती विद्यालय व उच्च माध्य. विद्यालय, रणपीसे नगर.
  6. सिताबाई कला महाविद्यालय सिव्हील लाईन रोड.
  7. एल.आर.टी.कॉलेज ऑफ कॉमर्स रतनलाल प्लॉट सिव्हील लाईन नेकलेस रोड, भाग-1.
  8. एल.आर.टी.कॉलेज ऑफ कॉमर्स रतनलाल प्लॉट सिव्हील लाईन नेकलेस रोड, भाग-1.
  9. भारत विद्यालय तापडीया नगर.
  10. शिवाजी हायस्कुल मुख्य शाखा देशमुख पेठ शिवाजी पार्कजवळ अकोट रोड.
  11. भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, गोडबोले प्लॉट, डाबकी रोड, जुने शहर, अकोला
  12. दि. नोएल इंग्लिश हायस्कुल विभागीय वर्कशॉपच्या मागे, कौलखेड रोड.
  13. उस्मान आझाद ऊर्दु हायस्कुल, रतनलाल प्लॉट चौक, अकोला
  14. होलीक्रॉस कॉन्व्हेंट, जठारपेठ चौक, अकोला
  15. गुरुनानक विद्यालय गांधीनगर सिंधी कॅम्प.
  16. श्री. शिवाजी विद्यालय, हरीहर पेठ, जुने शहर, अकोला
  17. ज्युबिली इंग्लिश हायस्कूल / ज्युनिअर कॉलेज, रामदासपेठ पोलीस स्टेशन जवळ, अकोला
  18. न्यु इंग्लिश हायस्कूल, रामदासपेठ पोलीस स्टेशन जवळ, अकोला
  19. राधाकिसन लक्ष्मीनारायण तोष्णीवाल कॉलेज ऑफ सायन्स, सिव्हील लाईन, अकोला
  20. मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्लॉट,डाबकी रोड जुने शहर.
  21. डि.ए.व्ही. कॉन्व्हेंट स्कूल, महात्मा गांधी रोड, अकोला
  22. अकोला आर्टस, कॉमर्स, सायन्स कॉलेज सहकार नगर, गोरक्षण रोड, अकोला
  23. स्व. ज्योती जानोळकर विद्यालय व उच्च माध्य. विद्यालय, कपिलवस्तू नगर, अकोला
  24. 24. कमल डवले ज्युनिअर कॉलेज चाचोंडी रोड मोठी उमरी.
  25. श्रीमती मेहरबानो ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स म. गांधी मार्ग, प्रमिलाताई ओक हॉल जवळ.
  26. श्री. नाथमल गोयनका लॉ कॉलेज, चौधरी हायस्कूल जवळ, रतनलाल चौक, अकोला
  27. कोठारी कॉन्व्हेंट इंग्लिश स्कुल विद्यानगर गोरक्षण रोड, इन्कम टॅक्स चौक.
  28.  खंडेलवाल इंग्लीश स्कूल, गोडबोले प्लॉट, डाबकी रोड, जुने शहर, अकोला
  29.  मनुताई कन्या शाळा, सिटी कोतवाली पोलीस स्टेशन जवळ, टिळक रोड, अकोला
  30. सावित्रीबाई फुले जि.प. माध्य कन्या शाळा, वसंत देसाई स्टेडीयम समोर, स्टेशन रोड, अकोला
  31.  सुधाकरराव नाईक महा. विद्या. तुकाराम चौक, अकोला
  32.  आदर्श विद्यालय, सरकार महर्षी डॉ. अण्णासाहेब कोरपे नगर, आदर्श कॉलोनी, अकोला
  33.  महाराष्ट्र माध्यमिक शाळा, केडीया प्लॉट जठारपेठ रोड, अकोला
  34.  माऊंट कारमेल स्कूल, अग्रसेन चौक, स्टेशन रोड, अकोला
  35. जि.एस.कॉन्व्हेंट मुख्य पोस्ट ऑफीसच्या मागे, अकोला.

आदेशात नमूद केल्यानुसार या सर्व परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रीतरित्या प्रवेश करणे, परीक्षा केंद्र परिसरात घोषणा देणे, यास मनाई करण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्रावर प्रवेश करणाऱ्या सर्व परीक्षार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे थर्मल, इफ्रारेड थर्मामिटरद्वारे तापमान तपासण्यात यावे, सर्व पर्यवेक्षकांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करणे अनिवार्य आहे. हवा खेळती राहण्याचे दृष्टीने परीक्षा केंद्रावरील सर्व खिडक्या तसेच दरवाजे उघड्या ठेवण्यात याव्यात. सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षार्थी यांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. परीक्षार्थी यांना ओळख असल्याशिवाय व मास्क लावल्याशिवाय प्रवेश देण्यात येवू नये. प्रत्येक परीक्षार्थी मध्ये किमान तीन फुटाचे अंतर राहील. अशी बैठक व्यवस्था करण्यात यावी. परीक्षा केंद्राच्या परिसराचे सोडियम हायपोक्लोराईटच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण करण्यात यावे.कोणत्याही परिक्षार्थी, अधिकारी, कर्मचारी यांना कोव्हिड-19 ची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ नजिकच्या रुग्णालयात भरती करावे. परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेत बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशीन, पानपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर, एसटीडी, ध्वनीक्षेपक इत्यादी माध्यम परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील. परीक्षा केंद्राचे परिसरात इंटरनेट, मोबाईल, फोन, सेल्युलर फोन ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई राहील. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्ती, वाहनास प्रवेशास मनाई राहील. उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी तसेच परीक्षा केंद्रावर देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी यांचेबाबत परीक्षा संबंधित कर्तव्य पार पाडण्याचे दृष्टीने लागू राहणार नाहीत,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Tags: AkolaAkola collectorMaharashtra Secondary Service JointNima Arora
Previous Post

युक्रेनमध्ये असलेले जिल्ह्यातील चार विद्यार्थी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात; आणखी कुणी असल्यास नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनास माहिती देण्याचे आवाहन

Next Post

हिवरखेड पाणीपुरवठ्याचे ५२ लाख रुपये भरणार तरी कोण? बिल न भरल्यामुळे एकाच वर्षात हिवरखेड येथील पाणीपुरवठ्याची लाईन पाच ते सहा वेळा झाली कट!

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
हिवरखेड पाणीपुरवठ्याचे ५२ लाख रुपये भरणार तरी कोण? बिल न भरल्यामुळे एकाच वर्षात हिवरखेड येथील पाणीपुरवठ्याची लाईन पाच ते सहा वेळा झाली कट!

हिवरखेड पाणीपुरवठ्याचे ५२ लाख रुपये भरणार तरी कोण? बिल न भरल्यामुळे एकाच वर्षात हिवरखेड येथील पाणीपुरवठ्याची लाईन पाच ते सहा वेळा झाली कट!

तेल्हाऱ्यात गुटखा विक्रेत्याच्या घरावर उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर यांचा छापा, पावणेदोन लाखाच्या गुटख्यासह एक आरोपी अटकेत

तेल्हाऱ्यात गुटखा विक्रेत्याच्या घरावर उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर यांचा छापा, पावणेदोन लाखाच्या गुटख्यासह एक आरोपी अटकेत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.