• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, July 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बोर्डी जिल्हा परिषद शाळेला शिक्षणाधिकारी यांची भेट.!

वेगळं करण्याची जिद्द असेल तर भारावून टाकणारे सृजनात्मक कार्य घडते वैशाली ठग

Our Media by Our Media
February 18, 2022
in अकोला, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, शिक्षण
Reading Time: 1 min read
269 3
0
Boradi
40
SHARES
1.9k
VIEWS
FBWhatsappTelegram

बोर्डी (देवानंद खिरकर):- आज जि. प. व. प्राथ. आदर्श शाळा बोर्डीला मा.डॉ. वैैशालीताई ठग मॅडम शिक्षणाधिकारी (प्राथ) अकोला यांनी गट शिक्षणाधिकारी मा. श्री. संदीप मालवे तथा मा. श्री. नंदकिशोर लहाणे स. का. अधिकारी, समग्र शिक्षा अभियान अकोट यांच्या समवेत आकस्मिक भेट दिली. शाळेच्या प्रत्येक भागाचा, शैक्षणिक बाबीसाठी केलेला उपयोग पाहून मॅडमनी प्रशंसा केली. सर्वप्रथम मॅडम यांनी प्रत्येक वर्गाला भेट दिली. विद्यार्थ्यासोबत संवाद साधुन मार्गदर्शन केले. तथा शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा केली.

डिजिटल साधनाच्या प्रभावी वापरा बाबत माहिती जाणून घेतली व इयत्ता निहाय अध्यापनाविषयी माहिती घेतली.  MASQUE /BALA अंतर्गत असलेल्या बाबींवर चर्चा केली. व अपेक्षीत असलेल्या सर्व बाबी या शाळेत पहायला मिळाल्या असे गौरवोद्गार यावेळी काढले. शाळेचे कल्पक BALA टिमचे जिल्हास्तरीय सदस्य मु. अ. श्री. उमेश चोरे तथा सर्व शिक्षकांचे विशेष अभिनंदन त्यांनी यावेळी केले. वर्ग स्तरावर असलेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. शाळेच्या इमारतीचा वापर एक मोठे शैक्षणिक समग्र साहित्य म्हणून वापरल्या जात आहेे. याबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी मा.श्री. संदीपजी मालवे गटशिक्षणाधिकारी पं. स. अकोट यांनीही समाधान व्यक्त केले.शाळेच्या वतीने मा. वैशालीताई ठग मॅडम यांचे स्वागत करण्यात आले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

यावेळी अकोट पं. स. मधील शिक्षिका सौ. लता बहाकर यांचे बळीराणी हे पुस्तक मॅडमना भेट देण्यात आले. इयत्ता पाचवीमधील विद्यार्थीनीने लिफ मेड ग्रीटींग मॅडमना भेट दिले. याप्रसंगी श्री.अजय अस्वार, श्री. प्रभाकर नागरे, कु. रचना शर्मा, कु.मनोरमा बुंदिले, कु.रुपाली साबळे, कु. किरण लहाने, श्री. आनंद नांदुरकर व शा. पो. आ कर्मचारी निलेश राजगुरु उपस्थित होते.

Tags: AkolaBordiVaishali thug
Previous Post

त्या धोकादायक “बोल्डर” मूळे विद्यार्थ्यांची वाट दुर्गम! ठेकेदाराच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे हजारो चिमुकल्यांचा जीव धोक्यात

Next Post

Ahmedabad serial bomb blast case : मोठा निकाल! अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ दोषींना फाशीची शिक्षा, ११ दोषींना मरेपर्यंत जन्मठेप

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Ahmedabad serial bomb blast case

Ahmedabad serial bomb blast case : मोठा निकाल! अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ दोषींना फाशीची शिक्षा, ११ दोषींना मरेपर्यंत जन्मठेप

akola news

महिला उद्योजकांना पाठबळ; शासनाचा विशेष उपक्रम: २५ पर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.