तेल्हारा दि :-. तेल्हारा नगरपालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावरील नाव चुकलेले आहे, हे समजून सुद्धा सदर चूक दुरुस्त न करण्याचा हेकेखोरपणा पालिका पदाधीऱ्यांकडून गेल्या अनेक महिन्यान पासून केल्या गेला होता हा महापुरुषांचा अवमान थांबविण्याकरिता तेल्हारा विकास मंच युवक आघाडीने अनेक आंदोलने केली असता ,१६ फेब्रुवारीला अखेर झालेली चूक दुरुस्त करून पालिका पदाधिकाऱ्यांनी रेंगाळत ठेवलेला प्रश्न अधिकाऱ्यांनी मार्गी लावला.
तेल्हारा पालिकेने प्रवेशद्वारावरील श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाबद्दल झालेली चूक दुरुस्त करावी व माँ जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानामधील घाणीचे साम्राज्य दूर करून स्वच्छता करण्यात यावी व सौंदर्यीकरनाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मांगनी तेल्हारा विकास मंच युवक आघाडी च्या वतीने या पूर्वी अनेक वेळा पालिका अध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देवून करण्यात आली होती तरीसुद्धा पालिकेने कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे सदर मागण्या मंजूर करण्याबाबत कुंभकर्णी झोपेत असलेल्या पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांना पुन्हा जागृत करण्याकरिता तेल्हारा विकास मंच युवक आघाडी च्या वतीने पालिकेच्या दरवाजाला बेशरम चे तोरण बांधून निषेध व्यक्त केला होता.
त्यानंतर झोपी गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी जागे होवून श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावरील नावात बदल करण्याबाबत ठराव केला परंतु ठरावाची अंमलबजावणी मात्र अनेक महीने न केल्यामुळे पुन्हा युवक आघाड़ीने ढोल बजाव आंदोलन केले होते व महापुरुषांच्या अवमानाबद्दल पोलीस स्टेशनला सुद्धा कळविले होते अशाप्रकारे युवक आघाडीच्या वतीने सदर विषयांबाबत सतत पाठपुरावा करून अधिकारी व पदाधिकाऱ्यांना सदर विषयांचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते तरीसुद्धा गेल्या अनेक महिन्यांपासून हा विषय रेंगाळत ठेवण्या मागचा नगरपालिकेचा हेतू काय असा प्रश्न उपस्थित करून शिवजयंती पूर्वी नावात झालेली चूक दुरुस्त न केल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवक आघाडीने दोन दिवसांपूर्वीच दिला होता त्यानंतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पधिकार्यांनी रेंगाळत ठेवलेला प्रश्न १६ फेब्रुवारीला मार्गी लावून नावात दुरुस्ती केल्यामुळे अखेर अनेक महिन्यांपासून तेल्हारा विकास मंच युवक आघाडीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाबद्दल पालिके कडून झालेली चूक दुरुस्ती बाबत केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.