तेल्हारा : आगामी होणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता प्रस्थापित राहावे यासाठी आज पोलीस विभागाद्वारे तेल्हारा शहरातून रूट मार्च काढण्यात आला.
आगामी शिवजयंतीसह येणाऱ्या सण उत्सवच्या पार्श्वभूमीवर आज उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर यांच्या उपस्थित आज शहरातून ठाणेदार ज्ञानोबा फड, पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा रूट मार्च शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आला होता.