अकोट-: अकोट जि. अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड प्रथमेश दिलीप सोळंके, वय २० वर्षे, याचे वर यापुर्वी रस्ता अडवणुक करणे व शिवागाळ करून मारण्याची धमकी देणे, गैरकायदयाची मंडळी जमवुन, कट कारस्थान रचने व जातीय तेड निर्माण करण्याचे उददेशाने, अफवा पसरवुन विजातीय समाजातील लोकांची दुकाने जाळुन नुकसान करणे, जबरी चोरी करणे, खंडणीची मागणी करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापूर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात गुंड प्रथमेश दिलीप सोळंके, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, नीमा अरोरा यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि. १४/०२/२०२२ रोजी पारीत केला.
मा. जिल्हादंडाधिकारी, सा. अकोला यांचे आदेशावरून प्रथमेश दिलीप सोळंके याचा तात्काळ शोध घेवून त्यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक १४/०२/२०२२ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.
सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, मोनिका राउत, तसेच सहायक पोलीस अधीक्षक, अकोट उप-विभाग, अकोट, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, पोहेकॉ मंगेश महल्ले, यांनी तसेच पो.स्टे. अकोट शहर येथील पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे तसेच पो.स्टे. तील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांची माहीती संकलीत करण्यात आली असुन त्यांचे विरुध्द एम. पी.डी.ए. अॅक्ट खाली कार्यवाही प्रस्तावति असुन माहे-जुलै २०२० ते जानेवारी २०२२ हया कालावधी मध्ये एमपीडीए कायद्यान्वये एकुण ५८ गुन्हेगारांनावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे