अकोला, दि.10: जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 7 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु दि. 7 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने लोकशाही दिन व दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यासाठी दिव्यांग लोकशाही दिनांचे आयोजन सोमवार दि. 14 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आयोजीत केले आहे,
असे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे यांनी कळविले आहे.