• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

“समान संधी केंद्र” च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन; सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम

Our Media by Our Media
February 9, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
99 1
0
सामाजिक न्याय
21
SHARES
712
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.9: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक व सहायक म्हणून काही विद्यार्थी यांची मदत घेऊन महाविद्यालयातच “समान संधी केंद्र” सुरु केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकास व गुणवत्ता वाढीसाठीसह मार्गदर्शन केले जाणार आहे. याकरीता प्रत्येक महाविद्यालयाने “समान संधी केंद्र” स्थापन करुन उपक्रमाचा अहवाल समाज कल्याण विभागाकडे सादर करावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी केले आहे.

महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुंलीना शिष्यवृत्ती, फ्रिशिप व इतर शासनाच्या योजना व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोबतच उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन करणे तसेच संवाद अभियान-युवा संवाद यासारखे कार्यक्रम सुरु करण्याकरीता आता महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यासाठी “समान संधी केंद्र” स्थापन करण्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांनी निर्देशित केले आहे. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक व सहायक म्हणून काही विद्यार्थी यांची मदत घेऊन महाविद्यालयातच “समान संधी केंद्र” करावे. तसेच केंन्द्र शासन पुरस्कृत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या सुधारीत विकासासह त्यांचे सर्व मार्गदर्शक सूचनामध्ये देखील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकास व व्यवसाय रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने या केंद्राच्या माध्यमातून उपयोजना करण्याचे ठरवले आहे. “समान संधी केंद्र”च्या माध्यमातून विद्यार्थ्याना त्यांच्या पुढील शिक्षणसाठी प्रोत्साहित करणे,रोजगार प्राप्तीसाठी किंवा उद्योजकता व व्यावसायिक होण्यासाठी कौशल्य शिक्षण या सर्व बाबीचा सर्वसमावेशक मार्गदर्शन याव्दारे करण्यांत येणार आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय,वरिष्ठ महाविद्यालय तसेच इतर सर्व शैक्षणिक संस्था व त्यांच्या अधिपत्याखालील येणाऱ्या सर्व महाविद्यालयामध्ये “समान संधी केंद्र” चालू शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. प्रत्यक्ष महाविद्यालय चालू नसले तरी प्रत्येक महाविद्यालयाने “समान संधी केंद्र” ची स्थापना करुन महाविद्यालय निहाय समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करुन त्यासाठी व्हॉट्सअप ग्रूप तयार करावा किंवा इतर समाज प्रसार माध्यमांचा वापर करुन संबधित महाविद्यालयातील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्याशी समन्वय करणे बाबत सुचित करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर “समान संधी केंद्र” स्थापन करुन समन्वय अधिकारी व सहायक म्हणून नियुक्त केलेल्या विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप भ्रमणध्वनी क्रमांकासह स्थापन केल्याबाबतचा अहवाल सहायक आयुक्त,समाजकल्याण,अकोला यांचे कार्यालयास साद करावे.

Tags: AkolaSocial Justicestudents
Previous Post

महाडिबिटी प्रणालीवरील शिष्यवृत्ती योजनेचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढा

Next Post

मुंबईत भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय होणार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Bharat Ratna Lata Mangeshkar

मुंबईत भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय होणार

lata Mangeshkar

गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.