अकोट – अकोट वर्तुळ वनकर्मचारी वन विभाग यांनीं अवैध सागवानवर धडक कारवाई करून लाखो रुपयांचा माल जप्त केला.मात्र चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले
अकोट शहरालगत परिसरातील सातपुडा जंगलातून अकोट वनक्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणावर सागवान तस्करी होत आहे.मात्र सागवान चोरांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी गुप्त बातमीदार कार्यरत केले आहेत.त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन सागवान तस्करी केली जात होती.ही माहिती अकोट वनविभाग सर्कल सी.एम.तायडे, वनरक्षक ए.पी.श्रीनाथ वनरक्षक सोपान जी.रेळे,सुमंत रजाने,मोहन वानखडे, यांना मिळाली होती.त्यानुसार अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्या सागवान चोरांच्या गुप्त बातमीदाराला गुंगारा देऊन छापेमारी केली असता लाखो रुपये किंमतीचे सागवान लाकूड जप्त करण्यात वन विभाग सर्कल सी.एम. तायडे वनरक्षक,ए.पी.श्रीनाथ वनरक्षक,सोपान जी. रेळे,सुमंत रजाने,मोहन वानखडे यांना वाढदिवसाच्या यश आले असले तरीही चोरटे मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहे.अकोट परिसरात बेकायदेशीर सागवान धुऊन तयार केले जात आहे.याची माहिती वनाधिकारी एम.तायडे यांना मिळताच त्यांनी फिल्मी स्टाईलने घटनास्थळी तात्काळ पोहोचून लाखों रुपये किमतीचे सागवान,कटिंग मशिन, स्क्रॅपिंग मशिन,सह किरकोळ सामान जप्त करून आरोपींवर कारवाई करत असतानां आरोपी व कामगार घटनास्थळा वरून फरार झाले आहेत. हे वृत्त लिहिपर्यंत सागवन मोजले जात असल्याने सागवान किती घनफूट आहे?याबाबत निश्चित माहिती उपलब्ध झाली नाही.मात्र लाखो रुपयांचे सागवानचा माल असल्याची चर्चा सुरू आहे.पूर्ण तपासणीनंतर त्याची किंमत एक ते दीड लाख रुपये असू शकते.अकोट हिवरखेड परिसरात बेकायदेशीर सागवान मोठ्या प्रमाणात धुतले जाते, वनविभागातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य चोखपणे पार पाडण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घ्यावे लागतात,मात्र त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुंगारा देण्यासाठी चोरट्यानी गुप्त खबरे तयार करून त्यांच्यामार्फत माहिती गोळा करून त्या आधारे आपला चोरीचा व्यवसाय बिनबोभाट सुरू आहे.मात्र याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्याने त्यांनी योग्य नियोजन करून छापमारी केली असता लाखो रुपये किंमतीचे सागवान जप्त करण्यात त्यांना यश आले असले तरीही चोरटे मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेत यापुढेही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सजग राहण्याची गरज असल्याचे अकोट,हिवरखेड परिसरात बोलले जात आहे.










