अकोला ( प्रती) सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे साहेब यांचा सत्कार करण्यात आला समाज क्रांती आघाडी व परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतिने सदर कार्यक्रम करण्यात आला कोरोनाच्या कार्यकाळात गाण्यांच्या माध्यमातून जनजागृती करणारे महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी खडसे साहेब आहेत प्रा.संजय खडसे साहेब व त्यांच्या सौभाग्यवती निता खडसे मॅडम यांनी कोरोनामुळे कोणावरही मृत्यू च सावट येऊ नये म्हणून गाण्याची माध्यमातून जनजागृती करत आहेत ते जनजागृती करणारे महाराष्ट्रातील पहिलेच अधिकारी आहेत त्यांच्या या कार्याच कौतुक व्हावे म्हणून समाज क्रांती आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बंडु दादा वानखडे, परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे व परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र प्रदेश सचिव सतिश भाऊ तेलगोटे यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला
 
			











