अकोट(देवानंद खिरकर)-
धारूर ते रामापुर हा दोन किलोमीटरचा रस्ता असून या रस्त्याचे काम पूर्ण झाले असुन रस्ता चांगला असल्याने या रोडवर वाहने सुसाट वेगाने जातात.धारुळ,रामापुर,बोर्डी या तीन गावातली नागरीक यारस्त्याने दररोज ये-जा करतात.आणि त्या परिसरात बोर्डी येथील शेतकऱ्याची शेती असल्यामुळे शेतकर्यांचे दररोज यारस्त्यावर टू व्हीलर,बैलबंडी, ऑटो,वाहने ये-जा करतात.रोडच्या दोन्ही बाजुला बंगाली काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढले असून वळणार अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही.येथील नागरीकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रशासन एखाद्या बळीची तर वाट बघत नाही ना या रस्त्यावरील बंगाली काटेरी झुडपामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.एखाद्या बळीगेल्यावर प्रशानाला जाग येईल का?असा प्रश्न या परिसरातील नगरीकांन मध्ये निर्माण झाला आहे. या रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणारे वाहने झुडपामुळे दिसत नाही.त्यामुळे कित्येकदा या रोडवर किरकोळ अपघात झाले आहे.तरी संबंधित विभागाने या रोडवरील काटेरी झुडपे लवकरात लवकर तोडावि अशी मागणी धारूळ रामापुर बोर्डी येथील शेतकरी व नागरिक करीत आहेत