तेल्हारा(प्रतिनिधी)- आज दि.15 जाने 2022 रोजी मा.जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार मा.प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी अकोट श्री.श्रीकांत देशपांडे व मा.मुख्याधिकारी श्री गोपीचंद पवार न प तेल्हारा यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील जे नागरिक कोरोना नियमाचे पालन करणार नाही तसेच विना मास्क शहरात फिरतील त्यांच्यावर कार्यवाही करणेकरिता श्री.रुपेश जोगदंड नगर अग्निशमन अधिकारी व श्री.निनाद आचार्य पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता यांच्या नेतृत्वाखाली पथके गठीत करण्यात आलेली आहेत.सदर पथक प्रमुख व त्यांच्या सहायक कर्मचाऱ्यांतर्फे आज तेल्हारा शहरात कोरोना नियमाचे पालन करणेबाबत जनजागृती करण्यात आली तसेच विना मास्क फिरणाऱ्या एकूण 46 नागरिक तसेच 2 व्यावसायिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.सदर कार्यवाहीत एकूण 5000/- रु चा दंड वसूल करण्यात आला. सदर पथके ही उद्यापासून सर्व दुकाने,हॉटेल,मंगल कार्यालय तसेच इतर व्यावसायिक यांची ऐका ठिकाणी जास्त लोक जमा होणार नाही तसेच कोरोना नियमाचे कुठे उल्लंघन होत नाही याबाबत शहरात तपासणी करणार असून जेथे कोरोना नियमाचे पालन होणार नाही तेथे दंडात्मक कार्यवाही करणार आहे.सदर पथकात कार्यवाही करताना पोलीस प्रशासनाचे हर्ष शुक्ला,रुपेश रावळे इ कर्मचारी तसेच न प चे दिनेश इंगळे,उद्धव पोहरकर,विजय आडे,जयवंत बोडे, मजीद खा,धनंजय विखे,संदीप बायड,चंद्रांकांत हागे इ कर्मचारी उपस्थित होते