मूर्तिजापूर -: महाराष्ट्र विद्यापीठ कायद्या मधील बदल हे विद्यार्थी केंद्रित नसून यामुळे विद्यापीठ ही राजकीय पक्षाचा अड्डा होणार असून या दुरुस्ती विधेयकाला लवकरात लवकर मागे घेण्यात यावे याकरता भाजयुमो रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे त्याचा पहिला टप्पा म्हणून काल भाजयुमो तर्फे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले व आज पासून मूर्तिजापूर तालुक्यातील अमरावती विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयकालामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक धोरणाचे होणारे नुकसान या बाबत माहिती फलक लावण्यात आले व राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.
माजी केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री खा.संजयभाऊ धोत्रे,जिल्हाध्यक्ष आ.रणधीरभाऊ सावरकर,आ.हरीशभाऊ पिंपळे,विजयजी अग्रवाल,तेजरावजी थोरात,युवा नेतृत्व अनुपजी धोत्रे,भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांतदादा पाटील,प्रदेश उपाध्यक्ष व अकोला जिल्हा प्रभारी विनोदजी वाघ यांच्या मार्गदर्शनात व भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या नेतृत्वात भाजयुमो तर्फे आंदोलन संपूर्ण जिल्ह्यासह मूर्तिजापूर तालुक्यात देखील सुरु असून राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा व राज्याचा शैक्षणिक धोरणाचा विचार करता हे काळे दुरुस्ती विधेयक त्वरित मागे घेण्यात यावे अशी मागणी भाजयुमो तर्फे लावून धरण्यात आली आहे.
यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,भाजपा तालुका अध्यक्ष भूषण कोकाटे,भाजप मूर्तिजापूर शहर रितेश सबाजकर,भाजयुमो तालुका अध्यक्ष पप्पू मुळे,भाजयुमो मूर्तिजापूर शहर अध्यक्ष हर्षल साबळे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अमोल पिंपळे,रोहित अवलवार,लकी अग्रवाल,प्रवीण लोकरे,राहुल गुल्हाने,अभिजित डहाळे,अतुल इंगोले,राम जोशी,विलास सावळे,मनोज गुप्ता,अविनाश यावले,आकाश गोडाले,अमित नागवान,लकी अग्रवाल,निलेश वानखडे,चेतन सदार,लखन आरोरा,अर्पित गावंडे,लखन मिलांदे,निक्की महाजन,आकाश सायघन,बादशाह,आकाश कोळवले,मंगेश खंडारे,संपूर्ण भाजपा युवा मोर्चा व कार्यकर्ते व पद्धधिकारी व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते