अकोला,दि.8 : भारतीय हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार येत्या ११ तारखेपर्यंत विदर्भातील जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या पार्श्वभुमिवर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाला सुरक्षित ठिकाणी ठेवावे. बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणला असल्यास मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. वीजांच्या कडकडाटापासून तसेच गारपीट झाल्यास स्वतःचा व आपल्या पशुधनाचा बचाव करावा, सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. तसेच या पार्श्वभुमिवर सर्व यंत्रणांनी सज्ज राहून दक्षता घ्यावी असे निर्देशही दिले आहेत.