अकोला : सामनावीर व आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू विनायक माळी यांचे नावाने जानेवारीत २१,२२,२३ रोजी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येत असून हनुमान मंडळ केळीवेळी चे दीपस्तंभ, मार्गदर्शक गुरुवर्य माजी आमदार गजानन राव दाळू गुरुजी यांच्या अकोला स्थित रामनगर येथील निवासस्थानी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली.
या बैठकीला आदरणीय दाळू गुरुजी, मंडळाचे अध्यक्ष माधवराव बकाल, ग्राम मंडळाचे अध्यक्ष गुरुदेव किशोर बुले, कबड्डी असोसिएशनचे सचिव वासुदेव राव नेरकर, मंडळाचे पंचप्राण डॉ. राजकुमार बुले, दिलीपराव आसरे, गणेशराव पोटे, संजय भाऊ चौधरी, अनिलजी गासे, संतोष भाऊ शिवरकर, विनायक माळी, अमोल चिलात्रे, ओमप्रकाश दाळू, कमलेश गावंडे, संजय बदरखे, श्रीकृष्ण आढे, प्रमोद सुरे, सुरज बुले, अरुण अमृतकार, अतुल जवंजाळ व धनंजय मिश्रा यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.