तेल्हारा (प्रतिनिधी)- मिळालेल्या गुप्त माहितीवरून आज सायंकाळी तेल्हारा पोलिसांनी एकास देशी कट्ट्यासह अटक केली असून नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार फड यांनी आपली दबंग फडगिरी दाखवून आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तेल्हारा शहरातील इंदिरा नगरात राहणारा संतोष रमेश ढाळे याच्या राहत्या घरी देशी कट्टा बाळगत असून पोलिसांनी ढाळे याच्या घरी धाड टाकली असता झडती घेतताना देशी कट्टा किंमत अंदाजे २५००० हजार जप्त केला नागरिकांच्या हेतूने घातक तसेच अवैध रित्या देशी कट्टा वापरून लोकांमध्ये दहशत निर्माण करणे या कारणावरून संतोष ढाळे नामक युवकाला आज तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार फड व त्यांच्या टीमने आज सदर कारवाई करून आरोपीविरुद्ध कलम ४३७/२०२१ कलम ३,२५ आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ठाणेदार फड यांनि पो कॉ गणेश सोळंके,अनिल सिरसाट,निकेश सोळंके,जयेश शिंगणारे यांनी केली