अकोला, दि.18 : सामाजिक न्याय विभागामार्फत अकोट व अकोला(नविन) येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. वसतीगृहात प्रवेशाकरीता शुक्रवार दि. 26 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
अनु.जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ, अपंग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया मागासवगीग्य मुलींचे शासकीय वसतीगृह पोपटखेड रोड, ता.अकोट, अकोला येथे तर अकोला(नविन) येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, मित्र नगर, खंडेलवाल लॉन, अकोला येथे इयत्ता आठवी ते पदवीपर्यंतच्या परीक्षेत प्रवेशाकरीता अर्ज दाखल करावे, असे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहाचे संबंधित गृहपाल यांनी कळविले आहे.