तेल्हारा : तेल्हारा शहरातील राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ उद्यानची अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे. त्याबाबत वारंवार निवेदन देऊन सुद्धा दखल न मुळे संतप्त युवासेना पदाधिकारी यांनी नगरध्यक्षाच्या दालनाला चॉकलेट चे तोरण बांधून निषेध व्यक्त करून आज युवासेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
तेल्हारा शहरातील राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ उद्यान सौंदर्यकरणसाठी लाखों रुपयांचा निधी खर्च करून सुद्धा या उद्यानातील विविध समस्यां जैसे थे आहेत त्यामुळे नगरपालिकेचा कारभार विरोधात याबाबत युवा सेनेच्या वतीने दिनांक ०५/०३/२०२१ रोजी याआधी तेल्हारा नगर परिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदन देण्यात आले होते. पण निवेदनाची कुठलेही प्रकारची दखल घेण्यात आली नसून माँ जिजाऊ उद्यान येथील समस्या जैसे थे आहेत .
नगर परिषद क्षेत्रातील शहरातील राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ उद्यान मध्ये तेल्हारा शहरातील लहान मुले, जेष्ठ नागरिक विरंगुळा म्हणून येतात पण या उद्यानाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. विशेष बाब म्हणजे या उद्यानातील विद्युत रोषणाई नाही, पेव्हर ब्लॉक पूर्ण दबले आहेत, लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य तुटक्या अवस्थेत आहेत. उद्यानातील फुलझाडे, लॉन उद्वास्थ झाले आहेत, रंगरंगोटी नाही व तिथली परिस्थिती बिकट आहे. मग नेमका हा लाखों रुपयांचा सौंदर्यकरणाचा निधी कोणाचा खिशात? हा प्रश्न युवासेनेचे च्या वतीने आपणांस या निवेदनाद्वारे यांनी उपस्थि करण्यात आहे. व याबाबत त्वरित दखल घेऊन उद्यानाची देखभाल करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली येत आहे.
त्याचबरोबर या उद्यान मध्ये माँ साहेब जिजाऊ यांचा पुतडा सुद्धा बसवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. व या उद्यानात १९६५ च्या भारत पाकिस्थान च्या युद्धातील वापरण्यात आलेले वॉर टॅंक बसवण्यात येत आहे. पण हे या युद्धातील स्मृती चिन्ह बसवण्याआधी माँ जिजाऊ उद्यान दुरावस्था व्यवस्थित करण्यात यावी हि विनंती अन्यथा युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याला सर्वस्वी जवाबदार नगर परिषद प्रशासनाची राहणार याबाबत तेल्हारा मुख्याधिकारी नगर परिषद व नगराध्यक्षा यांना निवेदन देण्यात येत आहे. यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रवक्ते सचिन थाटे, उपशहर प्रमुख प्रज्वल मोहड, गौरव धुळे, माजी शहर प्रमुख शिवसेना प्रदीप सोनटक्के, किशोर डांबरे, गजानन मोरखडे, अमित घोडेस्वार, वैभव देशमुख, रोहित अग्रवाल, प्रसाद देशमुख, आशिष राठोड, सुरज देशमुख, युवासेनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.