अकोला: इंडियन सोशल अँड रिसर्च फाउंडेशन, अकोला या संस्थेचे कला महाविद्यालय मलकापूर अकोला व उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिशन युवा स्वास्थ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोविड-१९ लसीकरण शिबिर शुक्रवार दि. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी संपन्न झाले. या शिबिरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व मलकापूर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या लसीकरण शिबिराचे उद्घाटन खंडेलवाल महाविद्यालय अकोला येथील प्रा. घुगे सर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या डॉ. गीताली पांडे मॅडम, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कुरणखेड उपकेंद्र शिवणी येथील आरोग्य कर्मचारी, विद्यार्थी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. या शिबिरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी व मलकापूर परिसरातील नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली. शिबीर यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.