• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०१९ : अद्यापही ३४८६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित; तात्काळ संपर्क साधण्याचे सहकार विभागाचे आवाहन

Our Media by Our Media
October 27, 2021
in अकोला, योजना, शेती
Reading Time: 1 min read
110 1
0
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
19
SHARES
791
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.27 महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत सर्व संबधीत बँका व सहकार विभागामार्फत सर्व पात्र खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी अनेक प्रयत्न केल्यानंतरही आज रोजी जिल्ह्यातील ३४८६ खात्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक आहे. त्यामुळे संबधीत खातेदार शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची प्रक्रिया खोळंबली आहे. तरी ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी सहकार विभागामार्फत दि. १५ ऑक्टोबर पासून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहीम दि.१५ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. तरी शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करावे,असे आवाहन सहकार विभागामार्फत करण्यात आले असून ही त्यांना शेवटची संधी आहे,असेही सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.

याबाबत सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व ग्रामीण बँक यांचे मार्फत १,१६,५४४ कर्जखाती योजनेच्या पोर्टल वर आजपर्यत अपलोड करण्यात आली असुन त्यापैकी १,०५,९४४ खात्यांना आजपर्यंत विशिष्ट क्रंमाक पोर्टल वर प्राप्त झाला आहे व त्यापैकी १,०२,४५८ खातेदार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असून त्यातील १,००,२२५ खात्यांवरील ६२८.१७ कोटी रुपयांची कर्ज मुक्तीची रक्कम संबधीत खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित खात्यांवरील रक्कम प्रक्रियेत आहे संबधीत बँका व सहकार विभागामार्फत सर्व पात्र खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी अनेक प्रयत्न केल्यानंतर ही आज रोजी जिल्ह्यातील ३४८६ खात्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक आहे. त्यामुळे संबधीत खातेदार शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची प्रक्रिया खोळंबली आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

प्रलंबित खात्याचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी सहकार विभागामार्फत दि. १५ ऑक्टोबर पासून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहीम दि.१५ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. त्यात संबंधित शेतकऱ्यांशी जिल्ह्यातील सर्व सरकारी यंत्रणा व इतर संस्था यांच्या मदतीने संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

तरी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांना विशिष्ट क्रंमाक प्राप्त झाला आहे त्यापैकी ज्या खातेदार शेतकऱ्यांनी आजपर्यत आधार प्रमाणीकरण केले नाही त्या शेतकऱ्यांनी ते ज्या ठिकाणी राहत असतील तेथील नजिकच्या सेवा क्रेदांला भेट देवुन आपला कर्ज खात्यांचे तात्काळ आधार प्रमाणीकरण करुन योजनेचा लाभ घ्यावा. हा कालावधी हा अंतिम संधी म्हणून देण्यात आला आहे. आधार प्रमाणीकरण न केल्यामुळे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याच्या तक्रारीचा नंतर विचार केला जाऊ शकणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन सहकार विभागामार्फत करण्यात आले आहे. तसेच यात काही अडचण / शंका असल्यास आपली बँक शाखा अथवा जिल्ह्यातील कोणत्याही सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, अकोला कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Tags: Aadhaar certificationfarmerMahatma Jotirao PhuleScheme
Previous Post

पाकिस्तान विजयाचा जल्लोष करणाऱ्या श्रीनगर मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थिनींवर युएपीए

Next Post

खादी ग्रामोद्योग मंडळ कार्यालयाचे स्थलांतर

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
खादी ग्रामोद्योग मंडळ कार्यालयाचे स्थलांतर

खादी ग्रामोद्योग मंडळ कार्यालयाचे स्थलांतर

nima arora collector jilhadhikari akola

जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती सभा: जनावरांच्या पाणवठ्यांची स्वच्छता मोहीम राबवून साजरी करा वसुबारस -जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.