• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जिल्हाधिकारी यांचे आदेश; शुक्रवार (दि.22) पासून अटीशर्तीसह चित्रपट व नाट्यगृह सुरु

Our Media by Our Media
October 19, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
99 1
0
nima arora
24
SHARES
711
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला :दि.19: कोविड-19 चा प्रार्दुभाव व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेच्या अटी व शर्तीचे पालन करुन जिल्ह्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे व बंदीस्‍त सभागृहे, मोकळया जागेत होणारे सांस्‍कृतिक कार्यक्रम, मनोरंजन केन्‍द्र यांना निश्चित करण्‍यात आलेल्‍या प्रमाणित कार्यचालन कार्यपध्‍दतीचा अवलंब करुन शुक्रवार दि. 22 ऑक्टोंबर पासून सुरु करण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

अटी व शर्ती याप्रमाणे :

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

1. सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

2. नाक आणि तोंड दोन्ही झाकल्‍या जाईल अशा प्रकारच्‍या मास्‍काचा वापर पूर्णवेळ बंधनकारक राहील.

3. आतमध्‍ये व बाहेर प्रवेश करतांना तसेच इतर ठिकाणी स्‍वयंचलीत हॅन्‍ड सॅनिटायझरची सुविधा उपलब्‍ध ठेवावी.

4. श्‍वसन शिष्‍टाचाराचे काटेकोरपणे पालन करण्‍यात यावे. शिंकतांना किंवा खोकलतांना टीशू पेपर अथवा रुमाल या साधणांचा वापर करावा. तसेच टिशू पेपरची योग्‍य ती विल्‍हेवाट लावावी.

5. कोणत्‍याही आजाराची लक्षणे आढळल्‍यास हेल्‍पलाईन नंबर वर संपर्क करण्‍यात यावा.

6. परिसरामध्‍ये थुंकण्‍यास सक्‍त मनाई राहील.

7. संबंधीत ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचारी यांनी कोविड-19चे अनुषंगाने लसीकरणाचे दोन्‍ही डोस घेणे बंधनकारक राहील. तसेच दुसऱ्या डोसपासनू किमान 14 दिवस पूर्ण झालेले असावे.

8. गर्दी टाळण्‍यासाठी सामाजीक अंतरानुसार रांगाची व्‍यवस्‍था करण्‍यात यावी.

9. एका स्क्रीनवर तसेच मल्टिप्लेक्समधील विविध स्क्रीनवर सलग स्क्रिनिंग दरम्यान मध्‍यतरानंतर पुरेसा वेळ निश्‍चीत करण्‍यात यावा.

10. एकूण आसण क्षमतेच्‍या केवळ 50 टक्के बैठक व्‍यवस्‍था बंधनकारक राहील.

11. पार्कीग व परिसराबाहेर गर्दीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यात यावे.

12. टिकीट, खाद्य, पेय पदार्थ ई. करिता ऑनलाईन बुकींग व ई-वॉलेट पध्‍दतीचा वापर करावा.

13. चित्रपटगृहाबाहेर खाद्य आणि शीतपेये यांना केवळ बाहेरच परवानगी राहील. चित्रपट गृहामध्‍ये खाद्य आणि पेय पदार्थांना परवानगी राहणार नाही.

14. खाद्य किंवा पेय पदार्थांच्‍या विक्री करिता जास्‍तीत जास्‍त काऊंटर ठेवण्‍यात यावे. केवळ पॅकींग केलेल्‍या पदार्थाना परवानगी राहील.

15. खाद्यपदार्थाचे स्‍टॉलवर सामाजिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक राहील.

16. खाद्य व पेय पदार्थाचे कचऱ्याची योग्‍य ती विल्‍हेवाट लावण्‍याची व्‍यवस्‍था व्‍यवस्‍थापक यांनी करावी.

17. सर्व परिसराचे दैनंदिन निर्जुतुकीकरण करण्‍यात यावे.

18. संबंधीत ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरोग्‍य सेतू अॅपचा वापर करावा.

19. खाद्यपदार्थ विक्री करणारे कर्मचारी, सहायक कर्मचारी यांनी लसीकरणाचे दोन्‍ही डोस घेणे बंधनकारक आहे. तसेच दुसऱ्या डोस पासून किमान 14 दिवस पूर्ण झालेले असावे.

20. वाताणूकूलिक यंत्राचे तापमान 24-30 डीग्री सेन्‍टीग्रेड पर्यंत असावे.

21. कोविडच्‍या सबंधाने बदनामी किंवा असभ्य वर्तन होणार नाही ही बाब व्यवस्थापक आणि स्थानिक अधिकारी यांनी समन्‍वयाने हाताळली पाहीजे.

22. खाद्यपदार्थ ऑर्डर करण्‍यासाठी ग्राहकांना क्‍यु आर कोडचा वापर करण्‍यास प्रोत्‍साहीत करावे.

23. सुरु करण्‍यात आलेल्‍या मनोरंजनाचे कार्यक्रमांचे परिचालन, कोविड-19संदर्भातील केन्‍द्र शासनाच्‍या व राज्‍य शासनाच्‍या कोणत्‍याही निर्बंधाचा भंग होणार नाही अशा पध्‍दतीने करणे आवश्‍यक आहे.

24. निश्चित करण्‍यात आलेल्‍या मार्गदर्शक तत्‍वांचा भंग झाल्‍याचे निदर्शनास आल्‍यास संबंधीतांविरुध्‍द नियमानुसार संबंधीत प्रशासकीय यंत्रणेकडून कारवाई करण्‍यात येईल.

25. कोविड-19 विषाणूंच्‍या प्रादुर्भावास प्रतिबंधकरण्‍यासाठी शासनाने तसेच या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेल्‍या आदेशातील बंधनकारक असणाऱ्या सूचना लागू राहतील.

26. कोविड-19 च्‍या व्‍यवस्‍थापनाबाबतचे राष्‍ट्रीय निदेश तसेच गृह कार्य मंत्रालय, आरोग्‍य व कुटूंब कल्‍याण मंत्रालय, महाराष्‍ट्र शासन इत्‍यादींनी जारी केलेली संबंधित मार्गदर्शक तत्‍वे यांचे सर्व कार्यामध्‍ये व व्‍यवहारामध्‍ये कोटेकोरपणे पालन करण्‍यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Tags: Movies and theatersNima Arora
Previous Post

ईद निमित्य आयोजित लसीकरण कॅम्पला उत्तम प्रतिसाद

Next Post

तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांचे कामे लवकर चालु करण्यासाठी वकिल संघटनेचे साखळी उपोषन सुरु

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांचे कामे लवकर चालु करण्यासाठी वकिल संघटनेचे साखळी उपोषन सुरु

तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांचे कामे लवकर चालु करण्यासाठी वकिल संघटनेचे साखळी उपोषन सुरु

आजपासून महाविद्यालये गजबजणार

आजपासून महाविद्यालये गजबजणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.