तेल्हारा (आनंद बोदडे): तेल्हारा येथिल बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समीतीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली या मेळाव्यामध्ये शेकडो कलावंत उपस्थित होते.
यावेळी सर्व प्रथम तथागत भगवान बुध्द विश्वरत्न. बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसुर्य माहात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यांचे पुजन करुन तेल्हारा तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी कलावंत न्याय हक्क समीती अकोला जिल्हा अध्यक्ष पंकज खंडारे बोलत होते.ते म्हणाले कलावंताच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समीतीचे प्रदेश अध्यक्ष सोमनाथ गायकवाड हे लढा देत असुन या करीता सर्व कलावंतानी एकञ येण्याची गरज आहे. असे मत त्यांणी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले सर्व कलावंताना समान मानधन मिळायला पाहीजे आणी ५० वर्ष वयाची अट शिथील करुन ती ४० वर्ष करावी या करीता कलावंत न्याय हक्क समीतीच्या वतीने पाठ पुरावा चालु आहे. असेही ते म्हणाले या मेळाव्याला जिल्हाअध्यक्ष पंकज खंडारे महीला जिल्हाअध्यक्षा सौ. रिताताई खंडारे, संगीताताई पोहरकार, मंगला गवारगुरु, मनिष खर्चे, तालुका अध्यक्ष मन्साराम निकाडे, नगरसेवक गोवर्धन पोहरकार प्रा. संजय हिवराळे गटनेता तथा पंचायत समीती सदस्य, शेषराव वाकोडे, देविदास तायडे, बाळासाहेब बोदडे, जितेद्र इंगळे, शाहीर मुरलीधर लोनाग्रे, संजय मानके महाराज, दिनकर नळकांडे, रामेश्वर अहेरकर, अरुण भोपळे, गजानन खुमकर, रामेश्वर दामोदर, जिवन बोदडे, रमेश वरठे, शिवदास कांगटे, मनिष देशमुख, तेजराव गवई, गोपाल ढोकणे, वासुदेव वानखडे, राजुभाऊ दातकर, मोहन मांडवकार, अरुन सिरसाट, संघपाल भोजने, प्रमोद तायडे, भारत पोहरकार, राहुल, गवई राजु हेरोडे, आकाश सरदार, शिवहरी वानखडे, गौतम सपकाळ, अशोक सरदार, च़ंद्रमनी गवारगुरु, जानराव गवई, गजानन तायडे, भाऊदेव सरदार, यांचे सह अनेक कलावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्थाविक महेश निकाडे तर संचालन व आभार आनंद बोदडे यांणी केले.