अकोला: दि.5: जिल्ह्यातील दिव्यांगाना आधार कार्ड (यु.डी.आय.डी.कार्ड) सहज उपलब्ध व्हावे याकरीता तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले होते. त्याअनुषंगाने तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा दिव्यांग लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा परिषदचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील औषधोपचार तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, मनोविकार तज्ञ, नाक, कान, घसा, तज्ञ डोळयांचे डॉक्टर व लहान मुलांचे डॉक्टर यांच्या उपस्थितीत सर्व उपकरणासह शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरांचे तालुकानिहाय वेळापत्रक याप्रमाणे : ग्रामीण रुग्णालय अकोट येथे 8 ऑक्टोंबर, ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे 22 ऑक्टोंबर, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथे 12 नोव्हेंबर तर प्राथमिक आरोग्य केंद्र पातुर येथे 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.