अकोला : दिनांक 2 ऑक्टोंबर 2021 रोजी अकोट येते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी कॉलेज दर्यापूर रोड अकोट येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन एन.सी.सी. विभाग व रक्ताचं नातं ग्रुप,महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक कामगार संघटना अकोला यांच्या वतीने केले होते. सदर रक्तदान शिबिर महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष आशिष भाऊ सावळे, जिल्हा उपाध्यक्ष तथा रक्ताचे नातं ग्रृप संस्थापक अध्यक्ष विजय भाऊ गावंडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित केले होते यावेळी 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे रुग्णांनसाठी झटणारे निस्वार्थी व्यक्तीमत्व, सामाजिक कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक व कामगार संघटना अकोला जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांचा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर सर व सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी रुग्णसेवक श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीणजी भोटकर सर, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज, अकोट शहर चे उपनिरीक्षक पी. एस. आय. राजेश जवसे, अकोट ग्रामीण ठाणेदार नितीन देशमुख, कॅप्टन सुनील डोबाळे, शिवाजी कॉलेज चे प्राचार्य ए.एल. कुलट, शिवाजी शाळेचे मुख्याध्यापक अतुल म्हैसने, एस. पी. वाघ, एन.सी.सी. प्रमुख श्री पी आर ठाकरे, सरपंच तुषार आढाऊ, अविनाश गावंडे, योगेश लबडे, पत्रकार लोकमत विजय शिंदे, कमलेश राठी, नरेंद्र कोंडे, देवानंद खिरकर, पवन बेलसरे, शेखर बेंडवाल महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना जिल्हा सचिव सतिश भाऊ तेलगोटे मान्यवर उपस्थित होते.यावेळी रक्त संकलित करायसाठी सरकारी रुग्णालयातील रक्तपेढी अकोला उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रवीण बोंद्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेकरिता विजय गावंडे, यांनी अथक परिश्रम घेतले.