अकोला: दि.4: हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार बुधवार (दि.6 ऑक्टोंबर) पर्यंत अतिवृष्टी व विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मोठया प्रमाणात जलसाठा झालेला असुन पाण्याची आवक वाढल्यास कोणत्याही वेळी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. अशा स्थितीत सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.