तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार ज्ञानोबा फड हे रुजू झाल्यानंतर शांतता कमिटीची सभा बोलावल्यानंतर त्यांनी सदर उद्गार काढले शहर तसेच तालुक्यातील कायदा सुव्यवस्था बाधित राहावा यासाठी पोलीस विभाग काम करणार आहे.
काल दिनांक २७ सप्टेंबर रोजी झालेल्या सभेत नवनियुक्त ठाणेदार यांनी शहर तसेच तेल्हारा पोलीस ठाणे अंतर्गत कायदा व सुव्यस्था कायम राहावा यासाठी झटणाऱ असून तेल्हारा तालुका हा शांतता आणि प्रेरणा देणारा आहे कारण गेल्या बऱ्याच वर्षांपासून येथे कुठलाच कुठल्याच समाजात तेढ निर्माण करण्याचे काम या तालुक्यातील नागरिकांनी केले नसून जिल्ह्यातील दहा वर्षातील कारकिर्दीत कधी तेल्हारा शहर तसेच तालुकाचे अतिसंवेदनशील म्हणून ओळख नसल्याचे पोलीस दफरी नोंद नाही. अकोट येथे असतांना शांतता प्रथापीत करणारा तालुका असून माझी अशा ठिकाणी बदली झाली हे माझे भाग्यच नागरिकांच्या हितासाठी तसेच कायदा व सुव्यस्था बाधित ठेवण्यासाठी मला पोलिसगिरी सुद्धा करण्याचे काम पडले तर मी करणार महिलासाठी पोलीस विभाग सतर्क असून कुठल्याही महिलेला त्रास झाल्यास त्यांनी पोलीस विभागाशी संपर्क करावा असे आवाहन केले.
गुंडगिरी करनाऱ्यांची भर चौकातून धिंड काढू जेणेकरून कायदा व सुव्यस्था बाधित राहील पोलिसांसमोर अनेक आव्हाने आहेत तरीपण नागरिकांच्या प्रति कधी केव्हांपन कुठेही तेल्हारा पोलिस आपल्या सेवेसाठी हजर आहेत शहरातील ट्राफिक गुंडगिरी हद्दपार करू असे प्रतिप्रादान ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी दिले.यावेळी शांतता कमिटीचे सद्यस्य शहरातील नागरिक हजर होते. यावेळी शांतता कमिटीच्या सदस्यांनी सुचवलेल्या सूचना पूर्ण करण्याचे आश्वासन ज्ञानोबा फड यांनी दिले.