अकोला: दि.22: जिल्ह्यातील एपीएल(केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यासाठी मासिक नियतन माहे ऑक्टोंबर 2021 ते मार्च 2022 करीता गहु 7770 क्विंटल व तांदुळ 1930 क्विंटल शासनाकडून मंजुर झाले आहे. तसेच शासकीय धान्य गोदाम यांच्या अहवालानुसार गहुचे 10851.08 क्विंटल शिल्लक असल्याने माहे ऑक्टोंबरचे वाटप शिल्लक असलेल्या साठातून पुढील प्रमाणे करण्यात येत आहे.
अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे सात हजार 116 शेतकरी लाभार्थ्यांना गहुचा 285 क्वि. तर तांदुळाचा 71 क्वि., अकोला ग्रामीण शासकीय धान्य गोदाम येथे 31 हजार 284 शेतकरी लाभार्थ्यांना गहुचा 1251 क्वि. तर तांदुळाचा 314 क्वि., बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम येथे 13 हजार 385 शेतकरी लाभार्थ्यांना गहुचा 535 क्वि. तर तांदुळाचा 134 क्वि., अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे 47 हजार 803 शेतकरी लाभार्थ्यांना गहुचा 1912 क्वि. तर तांदुळाचा 479 क्वि., तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे 30 हजार 080 शेतकरी लाभार्थ्यांना गहुचा 1203 क्वि. तर तांदुळाचा 301 क्वि., बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 16 हजार 215 शेतकरी लाभार्थ्यांना गहुचा 648 क्वि. तर तांदुळाचा 163 क्वि., पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 14 हजार 432 शेतकरी लाभार्थ्यांना गहुचा 577 क्वि. तर तांदुळाचा 145 क्वि. व मुर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 32 हजार 239 शेतकरी लाभार्थ्यांना गहुचा 1289 क्वि. तर तांदुळाचा 323 क्वि., असे एकूण 1 लक्ष 92 हजार 554 शेतकरी लाभार्थ्यांना गहूचे 7700 क्विंटल तर तांदुळाचे 1930 क्विंटल मंजुर नियतन झाला आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.