कुटासा(कुशल भगत)- अकोट तालुक्यातील टाकळी बु शिवरात येत असलेल्या शेतीमध्ये रानटी डुकरे रोही हरीण मोठया प्रमाणात नुकसान करित आहेत. आधीच गेल्या ५ ते ६ दिवस अतिवृष्टी मुळे नदी नाले तुडुंबभरून वाहून गेल्याने नदी नाल्या परसरतील शेती खरडून गेली उभ्या पिकावरून पाणी फिरले. मुग, उडीदला कोंब फुटले कपाशी सोयाबीनचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला.
अश्यातच हे नवे संकट शेतकऱ्यावर ओढवले आहे. रानडुकरे हे मोठया प्रमाणात कपाशीच्या पक्या भवऱ्या कपाशी व अन्य पिक मोडून टाकत आहेत. बरेच शेतकरी रात्री अपरात्री पिकाची राखवाली करतात पण हाता तोंडाशी आलेला घास हिरवल्या जात असल्याने शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला आहे.
या कडे वनविभागाने गंभीर्याने लक्ष्य देऊन नुकसानीची पाहणी करुन संभंधित शेतकऱ्याना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी व वन्य प्राण्यांचा कायम बंदोबस्त होईल अश्या उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी टाकळी बु. व परिसरातील शेतकरी करित आहेत.
प्रतिक्रिया
माझ्या शेतात पाच एकर कपाशी पेरलेली असून रानडुक्करे व हरीण नुकसान करीत आहेत.तरी वनविभागाने लक्ष्य देऊन त्यांचा बंदोबस्त करावा.
रामकृष्ण ना. वसु
शेतकरी टाकळी बु.