• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त व्यापक मोहिम: मंगळवारी (दि.२१) तीन लाख ६५ हजार बालकांना देणार जंतनाशक गोळ्या

Our Media by Our Media
September 17, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
98 1
0
JANTANASHAK METTING
20
SHARES
707
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला: दि.१७:  राष्ट्रीय जंतनाशक दिना (दि.२१ सप्टेंबर) निमित्त आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात वय वर्षे एक ते १९ या वयोगटातील  लाभार्थ्यांना (बालक व किशोरवयीन मुला मुली) जंतू नाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोंद असलेल्या  ९३१९२ बालकांसह शाळांमध्ये नोंद असलेले विद्यार्थी व नोंद नसलेले बालके मिळून  ३ लाख ६५ हजार ४६१ बालकांना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

या मोहिमेसाठी सर्वस्तरावरील यंत्रणा व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून सर्व बालकांपर्यंत जंतनाशक गोळी पोहोचवून त्यास ती खाऊ घालावी. गोळी दिलेल्या प्रत्येक बालक लाभार्थ्याची नोंद ठेवावी,असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले.

यासंदर्भात आज लोकशाही सभागृहात जंतनाशक मोहिम जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक पार पडली. यावेळी  डॉ. मनिष शर्मा, डॉ. विजय जाधव,  डॉ. भावना डोहाळे,  डॉ. जगदीश बनसोडे,  डॉ. श्वेता खालफळे,  डॉ. अस्मिता पाठक, पोलीस निरीक्षक गोविंद साबळे,  झेड.पी. अहमद, प्रकाश गवळी आदी उपस्थित होते.

यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात ही मोहिम ११२६ आशा सेविका, १४११ अंगणवाडी केंद्र, ११३९ शाळा, ३३३ खाजगी शाळा १२ तांत्रिक शिक्षण संस्था यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत अंगणवाड्यांमध्ये नोंद असलेल्या  ९३१९२ बालकांसह शाळांमधील विद्यार्थी व नोंद नसलेले बालके मिळून  ३ लाख ६५ हजार ४६१ बालकांना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त  वय वर्षे एक ते १९ या वयोगटातील बालकांना व किशोरवयीन मुला मुलींना  अंगणवाडी, शाळा तसेच केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न होईल. ही मोहिम राष्ट्रीय जंतनाशक दिन २१ सप्टेंबर रोजी राबविण्यात येईल. तर दि. २८ सप्टेंबर  रोजी जी बालके राहून गेली असतील त्यांना गोळी देण्यात येईल. या मोहिमेत सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग यांचा समावेश आहे.

अशी दिली जाणार गोळी

या मोहिमेत Albendazole 400 mg  ही गोळी  चावून खाण्यास देण्यात येईल. त्यातही एक ते  दोन वर्षे वय असलेल्या बालकास अर्धी गोळी (२०० मि. ग्रॅ.) पावडर करुन पाण्यात विरघळून, तर दोन ते तीन वर्षे वयाच्या बालकास  एक गोळी ( ४०० मि. ग्रॅ.) पावडर करुन पाण्यात विरघळून देण्यात येईल. गोळी घेतांना बालकाने नाश्ता अथवा जेवण केलेले असणे आवश्यक आहे.

लाभार्थी संख्येनुसार आवश्यक गोळ्यांचा साठा सर्व केंद्रस्तरावर पोहोचविण्यात आला आहे. आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांचे प्रशिक्षण झाले असून  शिक्षकांनाही याबाबत सचेत करण्यात आले आहे,अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

कृमी दोष व बालके

वय वर्षे एक ते १९ या वयोगटातील २ कोटी ४१ लक्ष  बालकांमध्ये आतड्यांचा कृमी दोष असल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. कृमी दोष हे रक्तक्षय व कुपोषणाचे कारण असून यामुळे बालकांचे  बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटते. भारतात अशा बालकांचे प्रमाण हे ३४.४ टक्के तर १५ ते १९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये ५६ टक्के तर मुलांमध्ये ३० टक्के रक्तक्षयाचे प्रमाण आहे. महाराष्ट्रात मातीतून प्रसारीत होणाऱ्या कृमी दोषाचे प्रमाण २९ टक्के आहे. कृमी दोष असलेली बालके  कायम अशक्त व थकलेली असतात. त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही.

Previous Post

सातारा : ११ वर्षीय मुलीवर अत्याचार, २५ हजारात प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणारे ५ जण ताब्यात

Next Post

अकोला येथे २४ रोजी डाक अदालत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
लोक अदालत

अकोला येथे २४ रोजी डाक अदालत

ZP ELECTION MEETING 17-9-21 (3) (1)

जि.प.,पं.स. पोटनिवडणूक: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.