अकोला : येथील वार्ड क्रमांक 18 मध्ये असलेल्या स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात गवत व काटेरी झुडपे वाढल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्याची सफाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त निमा अरोरा यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. वार्ड क्रमांक 18 मध्ये असलेल्या स्मशानभूमी मध्ये मोठ्या प्रमाणात गांजर गवत काटेरी झुडपे वाढली आहे. लाईट बंद आहेत. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. स्मशानभूमी मध्ये जाण्याकरिता रस्ता सुद्धा नाही आहे.
याकरिता महानगरपालिका आयुक्त निमा अरोरा यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी दिला सोबत सामाजिक कार्यकर्ते सतीश भाऊ तेलगोटे हे प्रामुख्याने उपस्थित होते