अकोला: अकोला-गेल्या दोन वर्षापासून शेतकरी संकटात असून महा विकास आघाडी सत्तेत आल्यापासून नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्र सह अकोला जिल्ह्यात शेतकरी आपले पीक हाती येण्याच्या आधी नैसर्गिक आपत्ती मुळे त्रस्त झाला आहे.
52 दिवस उलटल्यावर सुद्धा शेतकऱ्यांना मदत देण्यात आली नाही. सर्वे च्या नावावर शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा काम सरकार करत आहे. आता पुन्हा गेल्या दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अकोला जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिकासोबत जमिनीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिक विमा कंपनींना तसेच महसूल विभागाला व कृषी विभागाला सूचना देऊन त्वरित सर्वे करून शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी राज्य शासनाकडे जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करावा अशी आग्रहाची मागणी अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना केली.
सतत दोन दिवसांपासून अतिवृष्टी मुळे शेतकरी हतबल झाला आहे सोबत ग्रामीण जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. अकोला शहरात सुद्धा अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. यासंदर्भात प्रशासनाने लक्ष केंद्रित करून नागरिकांना दिलासा द्यावा यादृष्टीने पावले उचलावी नदीकाठच्या शेतीचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात वाशीम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दळणवळणाची व्यवस्था ठप्प झाली आहे.
त्यामुळे शासनाने व जिल्हा प्रशासनाने त्वरित सर्वे करण्यासंदर्भात आदेश निर्देशित करावे विमा कंपनी सोबत कृषी विभाग महसूल विभाग यांनी सर्वे करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व या संदर्भात शासनाने त्वरित अहवाल पाठवावा अशी मागणी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली असून गेल्या दोन दिवसापासून शेतकरी मदतीची वाट बघत असून केवळ शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार गप्पांच्या शिवाय काहीच करत नाही. शेतकऱ्यांचा व ग्रामस्थ ग्रामीण जीवनाचा अंत पाहण्याचा काम सरकारने करू नये अशी ही आमदार सावरकर यांनी सामावून ग्रामीण भागाची परिस्थिती विशद केली.
अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतात पाणी घुसून उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. पिकाच्या नुकसानीबाबत सर्वेक्षण व पंचनामे करण्याकरिता कृषी विभाग, विमा कंपनी तसेच महसूल विभाग यांच्याकडून तातडीने कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे. विमा कंपन्यांना ऑनलाइन वर माहिती भरणे बरेचदा तांत्रिक अडचणीमुळे शक्य होत नाही, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि त्यांचा टोल नंबर लागत नाही, विमा कंपन्यांकडे क्षेत्रिय स्तरावर काम करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या नुकसानीबाबत विहीत कालावधीत कळविणे शक्य होत नाही.
या सर्व परिस्थितीचा पूर्वानुभव लक्षात घेता विमा कंपनी,कृषी विभाग तसेच महसूल विभागाकडून पिकाच्या नुकसानीबाबत तातडीने संरक्षण व पंचनामे करण्यात यावे जेणेकरून नुकसानीचा आर्थिक मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण जाणार नाही तसेच विमा कंपन्या, कृषी विभाग,महसूल विभाग यांच्या कडून शेतकरी बांधवांच्या नुकसानीबाबत लेखी तक्रारी प्राप्त करून आवश्यक ती कारवाई करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना तातडीने निर्देश देण्यात यावेत.
यावेळी आमदार सावरकर यांच्यासोबत, भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, जयंत मसने,अंबादास उमाळे, शंकरराव वाकोडे, माधव मानकर,राजेश बेले,ज्ञानेश्वर ठाकरे, प्रवीण हगवणे,अभिमन्यू नळकांडे, मनीराम टाले, श्रीकृष्ण मोरखडे, तेजराव थोरात, किशोर पाटील, वैकुंठ ढोरे, अमोल गीते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.