• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मुले विकत घेऊन भिकारी बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Media Desk by Media Desk
September 4, 2021
in Featured, अकोला, गुन्हा
Reading Time: 1 min read
304 3
0
बहिणीच्या घरून येतांना झाले अपहरण , पोलीसने शोध लावला तर समोर आले भलतेच प्रकरण
48
SHARES
2.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

एका समाजसेवकाच्या दक्षतेमुळे मुलांना विकत घेऊन भिकारी बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. मुकुंदवाडीतील माय-लेकींनी अकोला आणि जालना येथून बाँडवर पाच आणि दोन वर्षांच्या दोन चिमुकल्यांना विकत आणून भीक मागायला लावले.

धक्‍कादायक म्हणजे, चिमुकल्यांनी काम न केल्यास या महिला त्यांना बेदम मारहाण करायच्या. माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार बुधवारी (दि. १) उघडकीस आला. मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपी माय-लेकींना अटक केली आहे. मात्र, त्यांनी मुले दत्तक घेतल्याचा दावा केला आहे. जनाबाई उत्तम जाधव आणि सविता संतोष पगारे (दोघी रा. रामनगर, मुकुंदवाडी) अशी आरोपी महिलांची नावे आहेत.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

मुकुंदवाडी, संजयनगर येथे राहणारे देवराज नाथाजी वीर हे समाजसेवक आहेत. त्यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार गुरुवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी फिर्यादीला नातेवाईक महिलेने फोन करून माहिती दिली की, रामनगरात राहणार्‍या जनाबाई जाधव व तिची मुलगी सविता पगारे या दोघी त्यांच्या ताब्यात असलेल्या मुलाला लाकडी लाटण्याने बेदम मारहाण करीत आहेत.

त्यावरून वीर यांनी रामनगर गाठून मुलाला आरोपी महिलांच्या ताब्यातून सोडविले आणि ही माहिती पोलिसांना दिली. पाच वर्षांच्या भिकारी मुलाने या महिलांची संपूर्ण कर्मकहाणी पोलिसांना सांगितली.

आरोपी महिलांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी दोन्ही महिला आरोपींना ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बिंग फुटल्यावर पोलिस निरीक्षक मनोज पगारे आणि समितीने आरोपी सविता पगारे हिची चौकशी केली. तिने सांगितले की, पीडित तरुणाला त्याच्या आई-वडिलांकडून ५५ हजारांना विकत घेतले आहे.

तसेच जालन्यातील एका दोन वर्षीय मुलाला देखील त्याच्या आई वडिलांकडून एक लाख रुपयांत दत्तक म्हणून विकत घेतले आहे. तसा शंभर रुपयांच्या बाँड पेपर व लेखी करारनामा देखील केला असल्याचे सविताने सांगितले. तर दोन्ही पीडित बालकांना बाल निरीक्षणगृहात दाखल केले आहे.

काम न केल्यास (भिकारी) आरोपी महिला चिमुकल्यांना मारहाण करायच्याच; मात्र त्यांना जेवणदेखील दिले जात नव्हते. त्यामुळे पाच वर्षीय मुलगा बाहेर पडायचा आणि कचर्‍यातील पोळ्या बाजूला काढून खायचा. हा प्रकार गल्‍लीतील अनेक महिलांनी पाहिला होता.

त्याहून काळीज पिळवटून टाकणारा प्रकार म्हणजे, या दोघी आरोपी महिला मुलांना बाथरूमच्या दारात मच्छरांमध्ये झोपायला लावायच्या. त्यांच्याकडून टॉयलेट साफ करून घ्यायच्या, असा प्रकार समोर आला आहे.

मुकुंदवाडी पोलिसांनी दोन्ही महिलेसह पीडित पाच वर्षीय मुलाला पोलिस ठाण्यात आणले. तेथे बाल संरक्षण कक्षाच्या अधिकारी अ‍ॅड. सुप्रिया इंगळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मुलाची विचारपूस केली. या महिलेने माझ्या मम्मी-पप्पांकडून विकत आणले. भीक मागायला न गेल्यास ती मारते, घरातील कामे सांगते, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करते, असे चिमुकला बोलू लागला. त्यामुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाला.

Previous Post

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

Next Post

आठवडी बाजाराच्या मुद्यावर पातुरचे प्रशासन हतबल ! नागरीकांचा जिव धोक्यात.

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
आठवडी बाजाराच्या मुद्यावर पातुरचे प्रशासन हतबल ! नागरीकांचा जिव धोक्यात.

आठवडी बाजाराच्या मुद्यावर पातुरचे प्रशासन हतबल ! नागरीकांचा जिव धोक्यात.

अकोला- अखेर चिमुकलीला HIV संक्रमित रक्त पुरवठा करणारी रक्तपेढी सिल!

अकोला- अखेर चिमुकलीला HIV संक्रमित रक्त पुरवठा करणारी रक्तपेढी सिल!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.