तेल्हारा(प्रतिनिधी): तेल्हारा तहसील कार्यालय यांनी अवैध रीत्या वाहतुकी दरम्यान जप्त केलेला वाळुचा साठा बरेच दीवसापांसुन तहसील कार्यालय येथे पडुन होता, या वाळुवर अनेक मोठे छोटे कंत्राटदार यांचा डोळा लागलेला असतांना अनेक कंत्राटदार यांनी त्यांच्या चालु असलेले विविध प्रकारच्या कामांकरिता या वाळुची रीतसर मागणी सुध्दा तहसील कार्यालय मार्फत जिल्हाधिकारी अकोला यांना केली होती,
परंतु ही अवैध्यरीत्या जप्त केलेली वाळु तेल्हारा शहरातील गोर गरीब घरकुल धारकांना वाटप करण्यात यावी याची मागणी तेल्हारा नगराध्यक्ष ,नगरसेवक तथा भाजयुमो चे पदाधिकारी यांनी तहसिलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन पुर्णतः याचा पाठपुरावा केला आणी या पाठपुराव्याला मान देत,महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियमानुसार मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मा.तहसीलदार येवलीकर सर यांनी पुर्णतः सहकार्य करत ही वाळु तेल्हारा शहरातील घरकुल धारकांना देण्याचे आदेश जाहीर केले, तेल्हारा भाजयुमो व नागरिकांन कडुन मा.तहसीलदार सर यांचे आभार व्यक्त होत आहेत..