• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, July 4, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home क्रीडा

भाविना पटेल हिने टोकियो पॅरालिम्पिकमध्‍ये घडवला इतिहास

Our Media by Our Media
August 28, 2021
in क्रीडा, फिचर्ड
Reading Time: 1 min read
109 2
0
भाविना पटेल हिने टोकियो पॅरालिम्पिकमध्‍ये घडवला इतिहास
17
SHARES
790
VIEWS
FBWhatsappTelegram

भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेल हिने टोकियो पॅरालिम्‍पिक स्‍पर्धेत इतिहास घडवला आहे. टोकियो पॅरालिम्‍पिक स्‍पर्धेत वर्ग चार टेबल टेनिसच्‍या अंतिम फेरीत भाविना पटेल हिने धडक मारली आहे. या स्‍पर्धेत टेबल टेनिसच्‍या अंतिम फेरीत स्‍थान मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. जाणून घेवूया भाविनाच्‍या संघर्षमय प्रवासाविषयी…

एक वर्षाची असताना झाला पोलिओ

हेही वाचा

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

भाविनाचा जन्‍म ६ नोव्‍हेंबर १९८६ रोजी गुजरातमधील मेहसाना जिल्‍ह्यातील वडगर गावात मध्‍यमवर्गीय कुटुंबात झाला. एक वर्षाची असताना तिला पोलिओ झाला. तिच्‍या कुटुंबावर दु;खाचा डोंगर कोसळला. पाच जणांच्‍या कुटुंबात भाविनाचे वडील एकटेच कमावते होते. त्‍यामुळे त्‍यांना भाविनावर उपचार करण्‍यात मर्यादा आल्‍या. तिच्‍यावर विशाखापट्‍टनम येथे शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. मात्र सर्वांच्‍या पदरी निराशाच पडली. यानंतर भाविनाचा व्‍हिलचेअरवरुन प्रवास सुरु झाला.

खडतर परिस्‍थितीशी दोन हात

एककडे घरची गरीबी तर दुसरीकडे पोलिओग्रस्‍त अशा अत्‍यंत खडतर परिस्‍थितीशी दोन हात करणाचा निर्धार भाविनाने केला. व्‍हीलचेअरवर बसून तिने टेबल टेनिसचा सराव सुरु केला. अथक सराव आणि दृढनिर्धाराच्‍या जोरावर भाविकाने २०११मध्‍ये पीटीटी थायलंड टेबल टेनिस स्‍पर्धा जिंकली. ही स्‍पर्धा जिंकत तिने आंतरराष्‍ट्रीय पातळीवर स्‍वत:ची ओळख निर्माण केली. यानंतर २०१३मध्‍ये बिजिंग पॅरा आशियाई स्‍पर्धेत वर्ग चार टेबल टेनिसच्‍या अंतिम फेरीत तिने धडक मारली. येथे रौप्‍य पदकावर आपली मोहर उमटवली. यावेळी भाविकाचे रॅकिंग हे दुसर्‍या क्रमाकांचे होते. यानंतर चार वर्षांनी तिने बिजिंगमध्‍ये अशियाई पॅरा टेबल टेनिस चॅम्‍पियनशिप स्‍पर्धेत रौप्‍य पटकाले.

भारताचे टेबेल टेनिसमधील रौप्‍यपदक केले निश्‍चित

टोकियो पॅरालिम्‍पिक स्‍पर्धेत तिने उपांत्‍य फेरीत चीनच्‍या पॅडलर झांग मियाओचा पराभव केला.

ती अंतिम फेरीत पोहचल्‍याने भारताचे रौप्‍य पदक निश्‍चित झाले आहे.

ती प्रथमच पॅरालिम्‍पिक स्‍पर्धेत सहभागी झाली आहे. आतंरराष्‍ट्रीय पातळीवर केलेल्‍या कामगिरीने भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. आता रविवारी २९ ऑगस्‍ट रोजी तिचा सामना चीनच्‍या खेळाडूबरोबर आहे. आता भाविका पॅरालिम्‍पिक स्‍पर्धेत सोनरी मोहर उमटविणार का याकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागले आहे.

Tags: Bhavina PatelTable tennisTokyo Paralympics
Previous Post

Happy Janmashtmi 2021; जन्माष्टमीच्या मराठी शुभेच्छा मॅसेज देऊन साजरी करा यंदाची जन्माष्टमी

Next Post

संतापजनक! औरंगाबादमध्ये महिलेला विवस्त्र करून मारहाण; रस्त्यावरील नागरिकांनी दिले अंगावरचे कपडे

RelatedPosts

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर
Featured

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

December 13, 2024
भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग
Featured

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

June 8, 2024
जाहीर
Featured

आयपीएलचे वेळापत्रक जाहीर.! सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यात पहिली लढत

February 22, 2024
अकोला येथे 10 मार्च रोजी ‘फिट अकोला’ मॅराथॉन स्पर्धा
Featured

अकोला येथे 10 मार्च रोजी ‘फिट अकोला’ मॅराथॉन स्पर्धा

February 22, 2024
जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
Featured

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

January 12, 2024
Featured

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

January 5, 2024
Next Post
Crime

संतापजनक! औरंगाबादमध्ये महिलेला विवस्त्र करून मारहाण; रस्त्यावरील नागरिकांनी दिले अंगावरचे कपडे

Rain

Rain alert : राज्यात पुढील ४ ते ५ दिवसांत जोरदार पाऊस

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.