• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

‘धन्य जाहले पूर्णब्रह्म!’ शहिदांच्या कुटुंबियांसमवेत पालकमंत्र्यांचे स्नेहभोजन; आली कृतज्ञतेची प्रचिती!

Our Media by Our Media
August 16, 2021
in अकोला जिल्हा, विदर्भ
Reading Time: 1 min read
104 1
0
Shahid kutumb Bhojan 6
17
SHARES
753
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.१५ ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे म्हणतात, पण आज ह्या पूर्णब्रह्मालाही कृतज्ञता वाटावी,अशी प्रचिती देणारे औचित्य पालकमंत्री बच्चू कडू यांनी साधले. निमित्त होते शहिद कुटुंबियांसमवेत स्नेह भोजनाचे! शहिदांचे वारस, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, पुत्र, कन्या यांच्या ‘वदनी’ गेलेला हा पूर्णब्रह्माचा ‘कवळ’ स्वतःलाच धन्य मानत होता!

स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहिदांच्या कुटूंबियांसमवेत पालकमंत्र्यांनी स्नेह भोजनाचे आयोजन केले. त्यात स्वतः पालकमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या हातांनी  जेवण वाढलं. जिल्हाधिकारी, प्रशासनातले इतर अधिकारीही वाढपी झाले. थाटामाटात म्हणावा असा हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. खरंतर शहिदांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्याची ही एक संधी होती, आणि स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाचे हे औचित्य अधिक औचित्यपूर्ण झालं.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू शहिदांच्या कुटुंबियांच्या विषयावर प्राधान्याने काम करीत आहेत. त्यांना शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांबाबत  ते अधिक जागरुक आहेत. प्रशासनातल्या प्रत्येकाने असं जागरुक असावं, याबद्दलही ते आग्रही आहेत. यासाठी जिल्ह्यातील २८ शहिद कुटुंबियांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटी त्यांनी घेतल्या. त्यांची अडीअडचण जाणून घेतली. त्यापैकी अनेकांचे  प्रश्न मार्गीही लागलेत.

पालकमंत्र्यांच्या या संवेदनशीलतेची प्रचिती आजच्या शहीद कुटुंबियांसमवेत स्नेहभोजन या कार्यक्रमातून आली. वीरमातांचे पाय स्वतः पालकमंत्र्यांनी धुतले. या स्नेहभोजनाचा थाट मोठा होता. प्रत्येक वीर माता, वीर पिता , वीर पुत्र, वीर कन्या, वीर पत्नी ह्यांना सन्मानाने बसविण्यात आले.  स्वतः पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रशासनातले उच्च अधिकारी वाढपी झाले. पालकमंत्र्यांनी आपल्या मनोगतात सांगितले त्याप्रमाणे ‘ तुमच्या सोबत जेवणाची संधी मिळाली, हे आमचे भाग्य’, त्यामुळे सर्वांचे सर्व अभिनिवेश गळून पडले. स्वतः ‘पूर्णब्रह्म’ असलेले ‘अन्न’ ही देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या  शहिदांच्या वारसांच्या, अशा वीर पुत्रांना जन्म देणाऱ्या माता पितांच्या तोंडी जाऊन धन्य होत होते.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह अनेक  अधिकारीही उपस्थित होते.

Tags: Aamdar Bachu kadu
Previous Post

स्वातंत्र्यदिन सोहळा जल्लोषात: स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे करणार- पालकमंत्री बच्चू कडू यांची घोषणा

Next Post

क्रीडापटूंनी अधिकृत संघटनांच्या माध्यमातून सहभागी व्हावे-पालकमंत्री बच्चू कडू: खेळाडूंच्या पौष्टिक आहारासाठी पालकमंत्री देणार स्वतःचे मानधन

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
kheladu Baithak

क्रीडापटूंनी अधिकृत संघटनांच्या माध्यमातून सहभागी व्हावे-पालकमंत्री बच्चू कडू: खेळाडूंच्या पौष्टिक आहारासाठी पालकमंत्री देणार स्वतःचे मानधन

sainik-school

सैनिक स्कूल : आता मुलींना सुद्धा प्रवेश मिळणार! कशी आहे प्रवेश प्रक्रिया?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.