• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 25, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home क्रीडा

खुब लढा शेर!; रवी कुमार दहियाची सुवर्णपदकाच्या सामन्यात झाली हार, पण जिंकली मनं!

Team by Team
August 5, 2021
in क्रीडा
Reading Time: 1 min read
103 1
0
खुब लढा शेर!; रवी कुमार दहियाची सुवर्णपदकाच्या सामन्यात झाली हार, पण जिंकली मनं!
16
SHARES
742
VIEWS
FBWhatsappTelegram

Tokyo Olympic, Ravi Kumar Dahiya GOLD medal bout : नेमबाज अभिनव बिंद्रा याच्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या दुसऱ्या भारतीय खेळाडूचा मान कुस्तीपटू रवी कुमार दहियाला पटकावण्यात अपयश आलं. ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय मल्लाला रशियाच्या युगूएव्ह झाव्हूरकडून पराभव पत्करावा लागला. रवी कुमारला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताचे हे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पाचवे पदक आहे. दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला रवी कुमार दहियानं कडवी टक्कर दिली. ( Ravi Kumar Dahiya gets Silver medal; gave his absolute best before going down fighting to 2 time reigning World Champion Zaur Uguev 4-7 in Final. Its 2nd Silver medal for India & 5th medal overall at Tokyo.)

रवी कुमार आणि युगूएव्ह यांनी पहिल्या मिनिटाला बचावात्मक खेळ केला. रवीनं पकड करण्याचे प्रयत्न प्रतिस्पर्धी खेळाडूनं अपयशी ठरवले अन् पहिला गुणही घेतला. ( Ravi Kumar Dahiya vs Zavur Uguev of ROC in men’s freestyle 57kg final)  रशियन खेळाडूनं दोन वेळा रवीला रिंगबाहेर काढून गुण पदरात पाडून घेतले. पण, रवीनं तिसऱ्या मिनिटाला याची भरपाई केली अन् रशियन खेळाडूला उतानी पाडून २-२ अशी बरोबरी मिळवली. रशियन खेळाडूनंही जबरदस्त पकड करताना पुन्हा ४-२ अशी आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांत ही आघाडी कायम राखली. ( Ravi trailing 2-4 at end of 1st period). दुसऱ्या सत्रात दोन्ही खेळाडू आक्रमक पवित्र्यात दिसले. रशियन खेळाडूनं पुन्हा एकदा रवीला रिंगबाहेर नेले व आघाडी ५-२ अशी मजबूत केली. रवीला रशियन खेळाडू स्वतःची पकड करूच देत नव्हता. रशियन खेळाडूनं आक्रमकता वाढवताना आघाडी ७-४ अशी आणखी मजबूत केली. रवीनं पकड केली होती परंतु पंचांनी आऊट साईट एरिया देत त्याला गुण नाकारले.

हेही वाचा

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

गुरुवारचा दिवस हा भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद खिळवणारा ठरला. ज्या भारतीय हॉकी संघाच्या ऑलिम्पिक सुवर्ण काळाबद्दल आपल्यापैकी अनेकांनी फक्त ऐकले होते, तो सुवर्णकाळ नव्यानं सुरू होताना आज सर्वांनी पाहिला. १९८० नंतर भारतीय पुरूष हॉकी संघानं ऑलिम्पिक स्पर्धेचे पदक नावावर केले. भारतानं बलाढ्य जर्मनीवर ५-४ असा थरारक विजय मिळवला. पण, या विजयानंतर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या त्या महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्या कामगिरीकडे. विनेशनं पहिला सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली, परंतु त्यापलीकडे तिला जाता आले नाही. रिपीचेज राऊंडमधून संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, तिही मावळली.

हॉकीनंतर भारतीयांना कोणत्या सामन्याची उत्सुकता होती, तर ही रवी कुमार दहिया याची… २०१२नंतर भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीत पहिले पदक जिंकून देण्याचा मान रवी कुमारनं पटकावला. त्यानं उपांत्य फेरीत  कझाकिस्तानच्या सनायेव्ह नुरीस्लॅम याचा पराभव केला. यावेळी रडिचा डाव खेळत त्याने रवीच्या दंडावर चावा घेतला. त्याने घेतलेल्या चाव्याचे व्रण रवीच्या दंडावर स्पष्ट दिसत आहेत आणि या जखमेसह भारतीय कुस्तीपटूला गुरुवारी फायनलमध्ये उतरला.

रवी कुमार दहियाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी सोनीपत येथे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आले. ”तो सुवर्णपदक जिंकेल, असा देशवासियांना विश्वास आहे. इथे सणासारखे वातावरण आहे,”असे रवीचे वडील राकेश दहिया यांनी सांगितले.

रवी कुमार दहियाच्या यशामागे वडिलांचा वाटा!
आज रवी दहिया (Ravi Dahiya ) याच्या या यशामागे वडिलांचा दीर्घ संघर्ष आहे. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीचे डावपेच शिकत असलेला आपला मुलगा कमकुवत पडू नये, म्हणून वडील राकेश दहिया हे रोज 70 किलोमीटरचा प्रवास करून त्याच्यासाठी दूध आणि लोणी घेऊन जात आणि त्याच्या सर्व गरजा पूर्ण करत.  राकेश दहिया स्वतः एक पैलवान होते – राकेश दहिया हे स्वतःच एक पैलवान राहिले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवावे असे त्यांचे स्वप्न होते. मात्र, घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

Tags: tokyo olympics 2021रवी कुमार दहिया
Previous Post

कोरोनामुळं नवऱ्याचा मृत्यू, एकट्या वहिनीवर दिरानं केला बलात्कार; भररस्त्यात पळवून पळवून मारलं

Next Post

अतिवृष्टीमुळे नादुरुस्त रस्ते व पुलांच्या दुरुस्तीकरिता 1 कोटी 3 लक्ष 46 हजार निधीस मान्यता

RelatedPosts

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर
Featured

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

December 13, 2024
भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग
Featured

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

June 8, 2024
जाहीर
Featured

आयपीएलचे वेळापत्रक जाहीर.! सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यात पहिली लढत

February 22, 2024
अकोला येथे 10 मार्च रोजी ‘फिट अकोला’ मॅराथॉन स्पर्धा
Featured

अकोला येथे 10 मार्च रोजी ‘फिट अकोला’ मॅराथॉन स्पर्धा

February 22, 2024
जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
Featured

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

January 12, 2024
Featured

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

January 5, 2024
Next Post
nima arora

अतिवृष्टीमुळे नादुरुस्त रस्ते व पुलांच्या दुरुस्तीकरिता 1 कोटी 3 लक्ष 46 हजार निधीस मान्यता

अकोला जिल्ह्यात इयत्ता १० वी व १२ वी च्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र

पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा :दि.९ ऑगस्ट ऐवजी दि.१२ ऑगस्ट रोजी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.