• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 24, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शिक्षण

विशेष लेखः- कौशल्य आत्मसात करा, रोजगार-स्वयंरोजगाराची कास धरा! आयटीआयसाठी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया

Team by Team
July 26, 2021
in शिक्षण
Reading Time: 2 mins read
110 2
0
विशेष लेखः- कौशल्य आत्मसात करा, रोजगार-स्वयंरोजगाराची कास धरा! आयटीआयसाठी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया
17
SHARES
803
VIEWS
FBWhatsappTelegram

राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेश सत्र २०२१ साठीचे प्रवेश हे संबंधीत मंडळांनी निर्गमित केलेल्या इ. १० वी च्या गुणपत्रिकेतील गुणांच्या आधारे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रणाली व्दारे करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेची सविस्तर माहिती व कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबतची माहिती सोबतच्या लेखात देण्यात आली आहे.

ग्रामीण भागापर्यंत प्रशिक्षण संधी उपलब्ध

हेही वाचा

एमपीएससी पेपर अवघड की सोपा यापेक्षा दारूच्या प्रश्नाचीच चर्चा..!

शासकीय शिष्यवृत्ती योजनेमुळे ‘ओबीसीं’ च्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे केवळ देशातच नव्हे तर जगभरात विविध स्वरुपातील तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाचा अभाव सर्वत्र जाणवत आहे. उद्योगक्षेत्रातील मनुष्यबळाची वस्तुस्थिती अशी असताना महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात किमान एक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार ३५८ तालुक्यात ४१७ शासकीय औ.प्र.संस्था कार्यरत असून त्यांची एकूण वार्षिक प्रवेश क्षमता जवळपास एक लक्ष आहे. त्यामध्ये आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलामुलींसाठी चार उच्चस्तर संस्था, अल्पसंख्यांकांसाठी स्वतंत्र दोन संस्था व ४३ शासकीय औ.प्र.संस्थांमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी आश्रमशाळा औ.प्र.संस्था अशा संस्थांचा समावेश आहे.  तसेच राज्यात एकूण ५३८ खाजगी औ.प्र.संस्था कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता साधारणत: ५० हजार इतकी आहे.

९१ अभ्यासक्रम व नोकरी- व्यवसायाची संधी

औ.प्र.संस्थांमध्ये एक व दोन वर्षे कालावधीचे ९१ व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या व्यवसायांचा अभ्यासक्रम हा उद्योगधंद्यातील तज्ज्ञांनी बनविलेला असून अभ्यासक्रम बनविताना कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या कौशल्यांचा विचार करण्यात आला आहे. प्रशिक्षण कालावधीत कारखान्यांना भेटी देणे, उद्योगधंद्यातील तज्ज्ञांचे व्याख्यान, कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करणे, प्रशिक्षण संपताच शिकाऊ उमेदवारी, नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करणे या सारखे उपक्रम राज्यातील सर्वच संस्थांत केले जातात.

शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण

युवकांना आवश्यक असलेले पायाभूत प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिल्यानंतर औद्योगिक आस्थापनेत वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री व तंत्र यांचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करुन सर्व दृष्टीने पूर्ण कुशल बनावा यासाठी शिकाऊ उमेदवारी योजना अस्तित्वात आली.  शिकाऊ उमेदवारांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या दरानुसार प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यावेतन मिळते. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील साधारणत: ११ हजार औद्योगिक आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या एकूण एक लक्ष जागा स्थित करण्यात आल्या आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांपेक्षा शिकाऊ उमेदवारीसाठी उपलब्ध जागा अधिक असल्याने प्रत्येक उत्तीर्ण उमेदवारास संधी उपलब्ध आहे.

 

आयटीआय नंतर पुढील शिक्षणासही वाव

इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवारांनी औ.प्र.संस्थेतून दोन वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता १२ वी ची समकक्षता देण्यात येणार आहे. तसेच इयत्ता १० वी अनुत्तीर्ण उमेदवारांनी औ.प्र.संस्थेतून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता १० वी ची समकक्षता देण्यात येणार आहे. तसेच औ.प्र.संस्थांमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश दिला जातो. अशा प्रकारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगार, शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत रोजगाराची संधी व उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध आहे.

ऑन जॉब ट्रेनिंग

राज्यातील विविध नामांकित औद्योगिक आस्थापनांसोबत संचालनालयाने सामंजस्य करार केले आहेत. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून राज्यातील शासकीय औ.प्र. संस्थांतील प्रशिक्षण सुविधांचा दर्जावाढ करणे, प्रशिक्षणार्थ्यांना अल्पमुदतीचे प्रशिक्षण देणे, On Job Training, रोजगाराच्या संधी, निदेशक प्रशिक्षण कार्यक्रम, अद्ययावत यंत्रसामुग्री व उपकरणे उपलब्ध करुन देणे, इतर आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करुन देणे यासारख्या बाबी प्रथम प्राधान्याने राबविण्यात येत आहेत.

कोविड काळात ऑनलाईन प्रशिक्षण

कोव्हीड-१९ या विषाणूजन्य साथीचा रोग प्रसार रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा एक भाग म्हणुन राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये काही कालासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. उद्भवलेल्या परिस्थितीत प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये असलेली भीती, भविष्यातील रोजगार/ स्वयंरोजगार/ उच्च शिक्षणाबाबत चिंता दूर करण्याचा प्रयत्नही करुन त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आवश्यक आहे.

या कालावधीत राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रशिक्षणार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या. संचालनालयामार्फत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन ऑनलाईन माध्यमांव्दारे सैद्धांतिक प्रशिक्षण (Theoretical Training) पूर्ण करण्यात येत आहे. तसेच मर्यादित संख्येत प्रशिक्षणार्थ्यांना संस्थेत बोलावून प्रात्यक्षिक प्रशिक्षण (Practical Training) पूर्ण करण्यात येत आहे. ऑगस्ट २०२० मधील नियोजित परीक्षा माहे फेब्रुवारी/ मार्च २०२१ मध्ये घेण्यात आल्या असुन या परीक्षांचा निकालही घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांसाठी शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण योजना, रोजगार, स्वयंरोजगार व उच्च शिक्षणाच्या संध्या उपलब्ध झाल्या आहेत.

ऑनलाईन केंद्रीय प्रवेश पद्धती

सन २०१३ मध्ये शासकीय औ.प्र.संस्थेतील प्रवेशप्रक्रीया व सन २०१५ मध्ये खाजगी औ.प्र.संस्थेतील प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. याचा अनुभव आणि होणारे फायदे लक्षात घेता राज्यातील सर्वच शासकीय व खाजगी औ.प्र.संस्थांमधील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन पद्धत राबविण्यात येत आहे.

असा करावा अर्ज

प्रचलीत अर्ज निश्चितीच्या कार्यपद्धतीनुसार उमेदवारांना प्रमाणपत्रे तपासणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे व प्रवेश अर्ज निश्चितीसाठी औ.प्र. संस्थांमध्ये जावे लागत असे. तथापि, करोना विषाणू चा प्रादुर्भाव व त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थिती मुळे उमेदवारांना प्रवास करणे गैरसोईचे असुन औ.प्र. संस्थांमध्ये देखील गर्दी टाळणे आवश्यक आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे मंडळाकडुन सर्व परीक्षार्थ्यांची माहिती संचालनालयास उपलब्ध करुन देण्यात आली आहे. औ.प्र. संस्थेत प्रवेश अर्ज भरतांना उमेदवारांनी त्यांचा इयत्ता १० वी परिक्षेचा बैठक क्रमांक (Seat Number) नमुद केल्यास त्यांची वैयक्तिक व इयत्ता १० वी च्या परिक्षेतील गुण या बाबत सर्व माहिती प्रवेश अर्जात आपोआप नमुद होईल (Auto Populate). तसेच ज्या उमेदवारांनी इतर मंडळांमार्फत इयत्ता १० वी परीक्षा दिली असेल त्यांना त्यांची सर्व माहिती प्रवेश अर्जात नमुद करावी लागेल. प्रवेश अर्ज शुल्क भरण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर सर्व ऑनलाईन पेमेंट माध्यमे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. उमेदवारांना प्रमाणपत्रे तपासणी, प्रवेश अर्ज शुल्क भरणे व प्रवेश अर्ज निश्चितीसाठी कोणत्याही औ.प्र.संस्थांमध्ये प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही.

गुणाधिक्याच्या आधारे प्रवेश

कोविड-१९ चा प्रादुर्भावामुळे जवळपास सर्वच माध्यमिक परीक्षा मंडळांनी इ.१० वी च्या परीक्षा रद्द करुन अंतर्गत मुल्यमापन वा अन्य तत्त्वानुसार उमेदवारांना गुणपत्रिका निर्गमित घेण्याबाबत निर्णय घेतला आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ८० व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इ. १० वी उत्तीर्ण व अन्य ११  व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी इ. उत्तीर्ण/अनुत्तीर्ण अशी शैक्षणीक अर्हता आहे. तसेच इच्छुक उमेदवार हे बहुतांश ग्रामीण व दुर्गम भागात वास्तव्यास असल्याने प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा न घेता संबंधीत मंडळांनी निर्गमित केलेल्या इ. १० वी च्या गुणपत्रिकेतील गुण व प्रवेश नियमावली नुसार निर्धारित गुणाधिक्य या आधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करुन निर्धारित प्रवेश नियमावली व पद्धतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

शिल्प कारागीर प्रशिक्षण योजना

शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत शासकीय औ.प्र. संस्थांमधील पव्लिक प्रायवेट पार्टनशिप (पीपीपी) योजनेंतर्गंत प्रवेशासाठी उपलब्ध जागा (IMC Seats) व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश देण्यात येणाऱ्या जागांवर प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार ८० ते १००% व्यवसाय प्रशिक्षण प्रतीपूर्ती योजना सन २०१९ पासुन नंतर प्रवेशीत प्रशिक्षणार्थ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ, योजनेसाठी पात्रता व आवश्यक कागदपत्रे या बाबत सविस्तर माहिती प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवाराच्या प्रवर्गानुसार प्रवेश निश्वितीसाठी त्यांना विविध प्रकारचे कागदपत्रे संबंधीत औ.प्र. संस्थेत सादर करणे आवश्यक असते. प्रवेश निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन घेण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी प्रवेश प्रक्रियेदरम्यान आवश्यक कागदपत्रांची यादी देखिल प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

प्रवेशासंबंधी नियम, आवश्यक दस्तऐवजांची माहिती व प्रवेश कार्यपद्धती या बाबत विस्तुत माहिती समाविष्ट असलेली माहिती पुस्तिका प्रवेश संकेतस्थळ https://admission.dvet.gov.in वर उपलब्ध करुन देण्यात  आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी  या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा,असे आवाहन कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने केले आहे.

माहिती संदर्भः प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला.

Tags: ITI AdmissionOnline central admission process ITIs
Previous Post

‘सुरक्षित फवारणी अभियान’: जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रचार रथ रवाना

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन केली पाहणी

RelatedPosts

MPSC
Featured

एमपीएससी पेपर अवघड की सोपा यापेक्षा दारूच्या प्रश्नाचीच चर्चा..!

December 3, 2024
देवेंद्र फडणवीस
Featured

शासकीय शिष्यवृत्ती योजनेमुळे ‘ओबीसीं’ च्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती

November 13, 2024
mpsc
Featured

MPSC च्या उशिरा अधिसूचनेमुळे ५० हजार जणांच्या नोकऱ्या धोक्यात

November 5, 2024
अकोला जिल्ह्यात इयत्ता १० वी व १२ वी च्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र
Featured

दहावीच्या विद्यार्थ्यांना आता गणित, विज्ञानच ‘नो टेन्शन’..! सरकारने घेतला मोठा निर्णय

October 23, 2024
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ
Featured

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ

September 20, 2024
admission
Featured

एमसीए, एमबीए, कृषी, नर्सिंगला यंदा फुल्ल डिमांड

September 19, 2024
Next Post
जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन केली पाहणी

जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन केली पाहणी

marriage

प्रेम जडलं अन् निकाह केला; लग्नातील सामान नेण्यासाठी गाडी आल्यानंतर नवऱ्याची झाली पोलखोल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.