• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जिल्ह्यात मुसळधार पावसाचा महावितरणला फटका,दुरूस्तीसाठी महावितरणचे युध्दस्तरावर प्रयत्न

Team by Team
July 24, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
148 2
0
Mahavitaran Akola
22
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- बुधवार दिनांक २१ जुलै रोजी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचा जोरदार फटका जिल्ह्यातील महावितरणला बसला आहे.पाचशेवर वीज खांबाचे व त्यावरिल वीज वाहिन्यांचे नुकसाने झाल्याने अनेक गावे अंधारात गेली होती. महावितरणच्या बिकट परिस्थितीतही होत असलेल्या युध्दस्तरावरील प्रयत्नाने बऱ्याच गावाचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात यश आले आहे. परंतू काही गावे अजूनही संपर्काबाहेरच असल्याने अंधारातच आहे. शिवाय तेथील नुकसानाची परिस्थिती अद्याप महावितरणला कळली नसल्याने मोर्णा नदिची पुरस्थिती कमी होताच बाकी गांवाचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात येणार असल्याने या काळात ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

विदर्भासह राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील मोर्णा व पुर्णा नदिकाठची गावे पाण्यात गेली आहे. पुराचा वेग एवढा प्रंचड होता की,या पुरात मोर्णा नदिच्या काठालगतचे १५ उच्च दाब वाहिनीचे तर २ लघूदाब वाहिनीचे वीज खांब आणि त्यावरिल वीज वाहिनी वाहून गेली आहे. उच्च व लघूदाब वाहिनीचे १७५ वीज खांब जमीनदोस्त झाले आहे. ६१ वीज खांब तुटले आहे ,तर २८१ वीज खांब जमिनीलगत झुकले आहे. याचबरोबर १० वितरण रोहित्रेही पडले असल्याने मोर्णा आणि पुर्णा नदिपरिसरातील २४ गावे ही अंधारात गेली होती.अशा परिस्थितीतही महावितरणने आपल्या कर्मचाऱ्यासह,कंत्राटदारांच्या मदतीने युध्दस्तराव कामाला सुरूवात केली.सर्वत्र चिखल,पाणी असल्याने वीज खांब,वीज वाहिन्या वाहून नेणे आणि अशा दलदलित वीज यंत्रणेची उभारणी करणे अशक्यप्राय कामे करण्यात आली. परिणामी निंभ्भी,म्हैसपुर,रिधोरा,सुकोडा, पाचमोरी,न्यु सुकोडा,जुना सुकोडा , अमानतपुर,ताकोडा,जलम,टाकळी, वाकापूर,गंदान्की व RPTS या गावाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.परंतू अजूनही लोणी,भोडव,सांगवी,मोहाडी,कानडी,वाखी,आखतवाडा,आगर,लोणाग्रा,दुधाळा,मांडला,कांचनपुर,बदलापूर,नवथळ आणि खेकडी या गावाचा वीज पुरवठा खंडित आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

वीज पुरवठा बंद असलेली सर्व गावे ही उगवा वाहिनीवर असल्याने या वाहिनीचे वीज खांब मोर्णा नदिच्या पुरात वाहून गेले आहे. शिवाय मोर्णा व पुर्णा नदिच्या पुरस्थितीमुळे या गावांना  जोडणारे रस्ते बंद असल्याने संपर्क होणे कठिण झाले आहे. पुरस्थिती ओसरताच या गावाचाही वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट यांच्या मार्गदर्शनत आणि उपकार्यकारी अभियंता सारंगधर केनेकर यांच्या नेतृत्वात आणि अभियंते अजय भोकरे, हेमलता पाटील ,तायडे, दिपक देशमुख, प्रविण बदुकाले, सचिन कळूसे यांच्यासह जनमित्र श्रीशिव निंबेकर, प्रशांत शेळके,जितू गवई, शुभम मोहोड, आमटे, भागवत, अभय भरसकले ,संजय कागणे,सोळंके, वाघोलीकर,तायडे, विजय केने व ठेकेदार -अनेश्र्वर इंजिनिअरिंग कंपनी, जैश्रिकृष्णा इलेक्ट्रिकलचे कर्मचारी कार्यरत आहेत.याशिवाय संबंधित सर्व परिस्थितीवर मुख्य अभियंता अनिल डोये,अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट  हे  विशेष लक्ष ठेऊन आहेत

Tags: akola newsAkola news in Marathimahavitaran akola
Previous Post

बायकोकडून होतोय छळ; कोरोनाच्या काळात ४२ तक्रारी!

Next Post

वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूला रौप्यपदक; टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं पदकांचं खातं उघडलं

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूला रौप्यपदक; टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं पदकांचं खातं उघडलं

वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूला रौप्यपदक; टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं पदकांचं खातं उघडलं

सरकारी नोकरी हवी आहे? तर मग ही बातमी वाचा

Sarkari Naukri: केंद्रीय विद्यालयांमध्ये पदभरती सुरू; लवकर करा अर्ज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.