• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोल्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार,अनेकांना सुरक्षीतस्थळी हलवले

Team by Team
July 22, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
612 6
0
Rain in Akola
107
SHARES
4.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)– 21 जुलै रोजी रात्री 8 वाजता सुरु झालेल्या पावसाने अकोल्यातील मोर्णा नदीला पूर आल्याची परिस्थिती आहे. शहरातील नदीच्या किनार्‍यावरील सर्वच सखल भागात पाणी साचले आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत कुठलिच यंत्रणा शहरातील सखल भागातील पाणी काढण्यासाठी उतरली नव्हती. महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा आज परिचय आला आहे. तर पोलिसांनी रात्री सखल भागातील नागरीकांना आपत्तीचा इशारा देत सजग ठेवण्याचे काम केले. दरम्यान मोर्णा नदीतून 1915 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. तरची पातळी 273.55 मिटर होती. तर उंची ही 4.95 मिटर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

शहरातील गंगानगर, अनिकट, दगडीपुल, राजेश्वर सेतू, कौलखेड, कामखेडा, ड्रिमलँड सिटी नगर, न्यू तापडीया नगर नाला फुटल्याने लोकांच्या घरात पाणी गेल्याचे चित्र होते. या भागात नागरीकांच्या घरात पाणी गेल्याने रात्री मोठी अडचण झाली आहे. शहरातील सखल भागात अनेक रस्त्यावर पाणीच पाणी साचले आहे. शहरातील नालेसफाईचा बोजवारा उडाला असून प्रशासनाने सकाळी कामाला लागण्याची गरज होती. पण, सकाळी 8 वाजेपर्यंत महापालिका व जिल्हा प्रशासनाचे कुठलेच वरीष्ठ अधिकारी पुर परिस्थिती व नागरीकांचे झालेले नुकसान पाण्यासाठी व त्यांच्या बचावाच्या सजगतेसाठी समोर आले नसल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

शहरात आज सकाळी मोर्णा नदीवरील तीन पुलांवर नागरीकांची गर्दी होती. दगडी पुलावरुन पाणी गेले नव्हते. तर दगडी पुलाच्या खालून मोर्णा नदीचे पाणी वेगाने शहराच्या बाहेर जात होते. राजेश्वर सेतुवरुन मोर्णा नदी दूथडी भरून वाहत होती. तर नागरीकांना येथून हुसकावून लावण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागत होते. शहरातील हाहाकाराची परिस्थिती असताना महापालिका व जिल्हा प्रशासनाने त्वरीत दखल घेण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. तसेच ज्यांचे मोठे नुकसान झाले त्यांना आर्थिक भरपाई शासनाने देण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. शहरातील अनेक गोदामांमध्ये पाणी भरल्याने पाणी उपसण्याचे काम या ठिकाणी होत होते. शहरातील रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने अकोलेकरांचे जनजीवन आज विस्कळित झाले आहे. प्रशासनाने त्वरीत पुढाकार घेत नागरीकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची गरज आहे. आज गुरुवार, 22 जुलै रोजी देखील हवामान खात्याने अकोल्यात पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरीकांच्या जीव व मालमत्तेच्या रक्षणासाठी सुरक्षित स्थळी नेण्याची गरज आहे. त्याच बरोबर कोरोना पासून फैलाव होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज नागरीकांनी व्यक्त केली.

Tags: Akola Rainrain in akola
Previous Post

राज कुंद्रा पोर्न फिल्म : मला ३० लाख देत होता, मी त्याचे २० प्रोजेक्ट केले

Next Post

अकोला : कर्जाच्या चिंतेने शेतकरी जोडप्याची आत्महत्या

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अकोला : कर्जाच्या चिंतेने शेतकरी जोडप्याची आत्महत्या

अकोला : कर्जाच्या चिंतेने शेतकरी जोडप्याची आत्महत्या

मद्यविक्रीच्या परवाना नुतनीकरण शुल्कात सूट

चार वाजता बार बंद, रस्त्यावरच 'दे दारू' सुरू!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.