तेल्हारा(प्रतिनिधी)- गेल्या दोन दिवस अगोदर घरी कोणी नसल्याचे बघून चोरट्यांनी जवळपास साडेतीन लाखाच्या मुद्देमालावर डल्ला मारल्याची घटना ताजी असतांना आज पुन्हा एक चोरीची घटना उघडकीस आली.
तालुक्यासह शहरात मोठया प्रमाणात गुन्ह्यामध्ये वाढ झाली असून गेल्या तीन दिवसात दोन ठिकाणी चोरट्यांनी चोरी करून लाखो रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला.शहरातील गायत्री नगर परिसरातील अरुण पाडिया यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्यानी जवळपास साडेतीन लाखाच्या मुद्देमालावर डल्ला मारला होता.प्रकरण ताजे असतांना गायत्री नगर मधील निवृत्ती गडम हे आपल्या परिवारासोबत बाहेर गावी गेलेले होते आज दुपारी आपल्या घरी आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.यावेळी घराचे कुलूप तोडून घरातील कपाटमधील नगद तसेच सोन्याचे दागिने असा जवळपास अडीच लाखाचा मुद्देमाल चोरट्यानि लंपास केला यामध्ये मात्र चोरट्यानि चांदीच्या कुठलेच दागिने चोरले नाहीत हे विशेष…याबाबत निवृत्ती गडम यांनी आपली तक्रार तेल्हारा पोलिसात दिली आहे.यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते मात्र त्याचा काही उपोयोग झाला नाही.पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत.