तेल्हारा(प्रतिनिधी)- तळेगाव पातुर्डा येथील गौतमा नदीवरील पुलाचे बांधकाम चालू असताना शेत रस्त्याची मोरी (रापटे ) बांधकाम वाल्यानी फोडली, तेव्हा शेतकऱयांनी ठेकेदाराला आमचा रस्ता रापटे टाकून चांगला करून द्या अशी विनवणी केले परंतु त्यांनी दुर्लक्ष केले, आता पूल जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, तरी सुद्धा शेत रस्ता सुरळीत झाला नाही. रस्त्यावर गावाचे सांडपाणी येते त्यामुळे रस्त्यात मोठा खड्डा पडला, नाली च्या संदर्भात ग्रामपंचायत ला विचारणा केली असता त्यांनी सुद्धा या मागणी कडे पाठ फिरवली, गावाच्या दृष्टी कोनातून हा रस्ता महत्वाचा आहे कारण हा मार्ग गावा मागे जातो, पुढे स्मशान भूमी कडे सुद्धा जातो, तसेच गुरा ढोराना पाणी पाजण्या साठी नदीत जाता येत नाही, ग्राम पंचायत, पुलाचा ठेकेदार हे दोन्ही आपली रस्त्याची जबाबदारी फेटाळत आहे आता शेतकऱ्यांना शेती करणे अडचणीचे झाले आहेत पैदल सुद्धा या मार्गा वरून जाता येत नाही,5 ते 10 मीटर चा गड्डा रस्यावर पडला, शेती पडित पडते कि काय अशी भीती शेतकऱ्यांना पडली आहे, या रस्त्या वरून 8 ते 10 शेतकारी जवळ पास 40ते 50 एकर शेती करतात.
काही गावकर्त्यांचे घरे सुद्धा आहेत, नाली मुळे त्यांना आपल्या घरी जाने येणे अडचणीचे झाले आहेत, हा रस्ता लवकर पूर्ण झाला नाही तर शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत