अकोला :- शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे डाबकी शेत शिवारात 7.95 आर जमिनीचे खोटी कागदपत्रे सादर करून जमिनीत फेरफार करण्यात आले. तसेच जमिनीची परस्पर विक्री केल्याने फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून दोन आरोपी, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यासह चौघाविरोधात जुने शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले.फिर्यादी राजेश्वर गुणवंतराव पारस्कर 42 रा. आदर्श कॉलनी, हमु घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट मुंबई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मौजे डाबकी शेतशिवारात शेतजमीन आहे. या जमिनीमध्ये आरोपी ज्ञानेश्वर गुणवंतराव पारस्कर रा. अकोला, सरोज ज्ञानेश्वर पारस्कर, मंडळ अधिकारी थिटे, तलाठी शितल अटल यांनी संगनमत करून 7.95 आर जमिनीचे खोटे कागदपत्रे बनवून जमिनीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार केली.तसेच 7.95 आर जमीन स्वताच्या नावावर करून घेत खोटी माहिती सादर करून जमीन परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती फिर्यादी राजेश्वर गुणवंतराव पारस्कर वय 42 यांना मिळाल्याने फिर्यादीने थेट जुने शहर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर गुणवंतराव पारस्कर रा. अकोला, सरोज ज्ञानेश्वर पारस्कर, मंडळ अधिकारी थिटे, तलाठी शितल अटल यांच्याविरोधात भादवि कलम 463, 467, 471, 420, 34 नुसार गुन्हे दाखल केले. याप्रकरणी जुने शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय लवंगळे अधिक तपास करीत आहेत.