अकोला: कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळयाच्या यादी मध्ये समावेश करण्यात न आल्याने आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात उत्कृष्ट अशी कोणतीही कामगिरी बजावली नाही, अशाचा देखील सत्कारामध्ये समावेश असल्याचे बोलले जात असुन उत्कृष्ट सेवा देणाऱ्याना मात्र या सत्कारापासुन डावलले असल्याची कुजबुज आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचारी मध्ये सुरु झाली आहे.
अकोला जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागांमध्ये कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिनांक ११ जुलै रोजी कस्तुरबा सभागृह जिल्हा स्त्रि रूग्णालय येथे सत्कार आयोजित केला, असला तरी यामध्ये स्वताच्या जिवाची पर्वा न करता उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना या सत्कारापासुन पध्दशिर पणे अलीप्त ठेवण्यात आल्याची चर्चा आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. विविध आरोग्य केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली त्यानी तेथील अधिकाऱ्याच्या कामाचे कौतुक करुन पाठ थोटपली आहे असे बऱ्याच कर्तव्यनिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना सत्कारापासुन वंचीत ठेवण्याचा प्रकार झाला आहे मात्र अधिकाऱ्यांच्या मर्तीतील केवळ पुढे पुढे करणाऱ्याचा आणि प्रशासकिय कामे करणाऱ्याचा समावेश सत्कारमुती मध्ये केल्याने उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यात तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे