अकोला : अकोल्यातील Akola बाळापूर Balapuir येथे घराची भिंती पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. (A child dies when a wall collapses due to rain)
अकोला जिल्ह्यातील अनेक भागात रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. रात्री आलेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घराचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तर बाळापुर शहरातील सतरंजी पुरा Sataranjipura भागात राहणाऱ्या शेख रसूल यांच्या घराची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.
रसूल यांचा परिवार झोपेत असताना ही भयानक घटना घडली. अचानक भिंत कोसळल्याने संपूर्ण परिवार भिंती खाली दबला गेला. काही तरी कोसळण्याचा आवाज येताच आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी धाव घेतली.
त्यात दाबलेल्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेख कामरान या बालकाला रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले तर पाच जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या घटनेचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.