अकोला– पंतप्रधान पिक विमा योजना अमृत महोत्सव सप्ताह 1 ते 7 जुलै या कालावधीत जनजागृती करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनाच्या चित्ररथास आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून जनजागृती सप्ताहाची सुरुवात केली.
एचडीएफसी इर्गा जनरल इंश्योरेन्स कंपनीच्या प्रचाररथाव्दारे शहरी व ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येणार आहे. या पिक विमाचा शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तरानीया, एचडीएफसी इर्गा कंपनीचे जिल्हा समन्वयक शुभम हरणे व अभिषेक रानडे यांची उपस्थिती होते.