अकोला– राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयीन निर्णयानुसार जिल्हा परीषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. त्यानुसार अकोला जिल्हा परिषदमधील 14 निवडणुक विभागाकरिता व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समितीमधील 28 निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणूकीकरीता तालुकानिहाय निवडणुक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या खालील प्रमाणे करण्यात आले आहे.
अ.क्र | तालुक्याचे नांव | निवडणुक निर्णय अधिकारी यांचे पदनाम | सहायक निवडणुक निर्णय अधिकारी यांचे पदनाम | नेमून दिलेले निवडणूक विभाग व निर्वाचक गण |
1 | तेल्हारा | उपजिल्हाधिकारी, रोहयो विभाग,
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला |
तहसिलदार तेल्हारा | निवडणूक विभाग ०१-दानापूर, ०३-अडगाव बु., ०४ तळेगांव बु.
निर्वाचक गण -०३-हिवरखेड, ०६-अडगाव बु.,१३-वाडी अदमपूर,१५-भांबेरी |
2 | अकोट | उपविभागीय अधिकारी अकोट | तहसिलदार अकोट | निवडणूक विभाग १० अकोलखेड, १५-कुटासा
निर्वाचक गण १८- पिंप्री खु., १९-अकोलखेड, २५- मुंडगाव, २८-रौदळा |
3 | मुर्तिजापुर | उपविभागीय अधिकारी मुर्तिजापुर | तहसिलदार मुर्तिजापुर | निवडणूक विभाग -१७-लाखपूरी,
१८-बपोरी, निर्वाचक गण ३४-लाखपूरी, ३५-ब्रम्ही खु. ३९-माना, ४६-कानडी |
4 | अकोला | उपविभागीय अधिकारी अकोला | तहसिलदार अकोला | निवडणूक विभाग २६-घुसर,
२९-कुरणखेड, ३०-कानशिवणी निर्वाचक गण ४९-दहिहांडा, ५२-घुसर, ५७-पळसो, ५८-कुरणखेड, ६६-चिखलगांव |
5 | बाळापुर | उपविभागीय अधिकारी बाळापुर | तहसिलदार बाळापुर | निवडणूक विभाग ३४-अंदुरा, ३९-देगाव निर्वाचक गण ७२-निमकर्दा,७५-पारस भाग-१, ७८-देगाव,८०-वाडेगाव भाग क्र.२ |
6 | बार्शिटाकळी | उपजिल्हाधिकारी, भुसंपादन(केपीएमपी)
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला |
तहसिलदार बार्शिटाकळी | निवडणूक विभाग ४२-दगडपारवा, निर्वाचक गण ८३-दगडपारवा,
८६-मो-हळ, ८९- महान, ९१-पुनोती |
7 | पातुर | उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला |
तहसिलदार पातुर | निवडणूक विभाग ४८-शिर्ला निर्वाचक गण ९६-शिर्ला, ९७-खानापुर, १०५-आलेगाव |
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार निवडणूकीच्या तारखांची सुचना व निवडणूकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी मंगळवार दि. 29 जून 2021 रोजी प्रसिध्द करतील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद/पंचायत समिती/ग्रामपंचायत निवडणूक विभागाचे प्रभारी अधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.