अकोला– आज दि.16 दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 916 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 900 अहवाल निगेटीव्ह तर 16 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 172 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.15) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 21 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57260(42881+14202+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 16+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 21 = एकूण पॉझिटीव्ह-37
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 284627 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 281167 फेरतपासणीचे 396 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3064 नमुने होते. आजपर्यंत एकूण 284570 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 241689 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
16 पॉझिटिव्ह
आज दि.16 दिवसभरात 16 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व 10 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- बार्शीटाकळी-एक, बाळापूर-एक, पातूर-एक, तेल्हारा-एक, अकोला मनपा क्षेत्र-12), दरम्यान काल (दि.15) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 21 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
172 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दि.16 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, उपजिल्हा रुग्णालय येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, थोटे हॉस्पीटल येथील एक, मातृभूमी हॉस्पीटल येथील एक, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, फतेमा हॉस्पीटल येथील पाच, के.एस. पाटील हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, काळे हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 148 असे एकूण 172 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
1098 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57260(42881+14202+177) आहे. त्यात 1116 मृत झाले आहेत. तर 55046 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1098 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.