• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे ‘वृक्ष क्रांती मिशन’ तर्फे वृक्ष पुनर्लागवड

Team by Team
June 16, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
100 2
0
Tree plantation
16
SHARES
725
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला–  वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीत उन्मळून पडलेल्या वृक्षांचे पुनर्लागवड करण्याचा प्रयत्न वृक्ष क्रांती मिशन तर्फे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे यशस्वी करण्यात आला.

याबाबत वृक्ष क्रांती मिशनचे अध्यक्ष नाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या आवारात वादळाने अंदाजे ४० वर्ष वयाचे मंकी ट्री (काजनास पिन्नात ) या जातीचा वृक्ष  उन्मळून पडला. याबाबत डॉ.संजय भोयर यांनी दिली. त्यानुसार नाथन, डॉ. माने,  डॉ. हर्षवर्धन देशमुख, डॉ. एस. एस. हर्णे यांनी पडलेल्या झाडाची पाहणी केली व झाड कोठे स्थलांतरित करून लावायचे ते ठिकाण ठरविण्यात आले. वृक्ष  उचलून नेण्यासाठी क्रेन व जे.सी.बी यंत्राची व्यवस्था करण्यात आली. त्या नंतर कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनात ६ x ६ x ६ फूट आकाराचा खड्डा खणून, त्यात चांगली माती, पाला पाचोळा, ट्रायकोडर्मा बुरशी नाशक,सुडोमोनास ह्याचे कल्चर मातीत मिसळून एक फुटाचा चांगल्या मातीचा थर केला. त्यानंतर शास्त्रीय पद्धतीनं झाडाच्या एक चर्तुर्थांश फांद्यांची छाटणी करण्यात आली व नंतर क्रेनच्या साहाय्याने पूर्ण झाड काळजीपूर्वक उचलून सरळ उभे करून खड्ड्यात ठेवण्यात आले. त्यानंतर झाडाच्या तुटलेल्या मुळांना बुरशी लागू नये म्हणून बाविस्टीन पाण्यात मिसळून ते मिश्रण झाडाच्या तुटलेल्या मुळांना लावण्यात आले. त्यानंतर परत बुरशीनाशक मिश्रीत माती खड्ड्यात टाकून खड्डा भरण्यात आला. झाड मजबुतीने उभे राहावे म्हणून झाडाचे बुंध्यापाशी, मातीचा भर देण्यात आला. नंतर झाडा भोवती भरखते व पाणी देण्याच्या हेतून मोठे आळे करण्यात आले व नंतर झाडाला टँकरने भरपूर पाणी देण्यात आले. तसेच मुळांची  वाढ चांगली व्हावी म्हणून ह्यूमिक ॲसिड पाण्यात मिसळून रिंग पद्धतीनं ड्रेंचिंग करण्यात आले, सोबतच झाडांना नवीन पालवी फुटावी म्हणून सिंगल सुपर फोस्फटचा डोस मातीत मिसळून टाकण्यात आला. झाडाची ही पुनर्लागवड करण्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील शास्त्रज्ञ डॉ. सुधीर वडतकर, डॉ. शामसुंदर माने, डॉ. ययाती तायडे, डॉ. हर्षवर्धन देशमुख , डॉ. संजय कोकाटे यांचे तांत्रीक सहाय्य लाभले. या उपक्रमासाठी वृक्ष क्रांती मिशनचे श्रीमती विद्याताई पवार , विजय कुमार गडलिंगे, गोविंद बलोदे, पांडे, तुंबडी, पृथ्वीराज चव्हाण व कु. विशाखा निंगोत ह्यांचे साहाय्य लाभले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अशा प्रकारे वादळाने वा अन्य कारणाने उन्मळून पडलेल्या वृक्षाचे तसेच  विकास कामे वा अन्य कारणाने वृक्ष तोडावयाचा असल्यास वृक्ष उन्मळून पडल्यानंतर शक्य तितक्या लवकर व वृक्ष तोडावयाचा असल्यास त्या आधीच वृक्ष क्रांती मिशनच्या अकोला शहरातील आगरकर विद्यालयाच्या आवारातील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन नाथन यांनी केले आहे. त्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक ७०३८४७६८६१ हा आहे.

Tags: akola newspanjabrao deshmukh krishi vidyapeeth akola
Previous Post

शिवसेना भवनासमोरील आंदोलनात राडा, शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप!

Next Post

खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या जलसाठ्यातून पाण्यासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या जलसाठ्यातून पाण्यासाठी  अर्ज पाठविण्याचे आवाहन

खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या जलसाठ्यातून पाण्यासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

health worker corona warrier

Akola Corona Update: 16 पॉझिटीव्ह,172 डिस्चार्ज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.