• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी वाशिम येथे अन्न-औषध चाचणी प्रयोगशाळा वेगात पूर्ण करण्याचे ना. डॉ. शिंगणे यांचे निर्देश

Team by Team
June 15, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
84 1
0
Food-Drug Testing Laboratory at
13
SHARES
608
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जनतेला चांगल्या दर्जाचे प्रमाणित अन्न पदार्थ व औषधे मिळण्याकरीता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या  अत्याधुनिक प्रयोगशाळा महत्वाची भूमिका पार पाडतात. अशा प्रकारच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे कार्यरत आहेत. अशाच प्रयोगशाळा राज्याच्या अन्य भागातही  सुरू करण्याचे शासनाचे नियोजन असून  त्यानुसार अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या पाच जिल्ह्यांसाठी वाशिम येथे अन्न व औषध चाचणी प्रयोगशाळा  उभारण्यात येत आहे.  या प्रयोगशाळेच्या उभारणीचे काम वेगात पूर्ण करा तसेच प्रयोगशाळेतील पदनिर्मितीचा प्रस्ताव तातडीने पाठवावा,असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री  डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी दिले.

 ना. डॉ. शिंगणे हे सोमवारी (दि.१४) अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मूर्तिजापूर येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.  यावेळी अमरावती विभागातील सह आयुक्त (अन्न) सुरेश अण्णापुरे, सह आयुक्त अशोक बरडे, सहा. आयुक्त घरोटे, सहा. आयुक्त (औषधे) विनय सुलोचने, सागर तेरकर, हेमंत मेटकर, अन्न सुरक्षा अधिकारी प्रभाकर काळे आदी उपस्थित होते.
ना. डॉ. शिंगणे म्हणाले की, राज्यामध्ये अवैध गुटखा, प्रतिबंधात्मक अन्न पदार्थ विक्री रोखण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. अमरावती विभागातही अवैध गुटखा विक्री होत असल्यास त्यावर तातडीने कारवाई करावी.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

      ते पुढे म्हणाले की, म्युकर मायकोसिस आजार कोविड रूग्णसंख्या कमी होत असल्यामुळे कमी होत आहे. या आजारावरील औषधे महागडी असून त्याचे रेशनिंग आवश्यक आहे. म्युकर मायकोसिस वरील अँटी फंगल औषधांचा तुटवडा होवू देवू नये. ही औषधे शासकीय रूग्णालयांमार्फतच रूग्णांना देण्यात येत असून खाजगीमध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे. यासाठी शासन सकारात्मक असून लवकरच रिक्त पदांची भरती घेण्यात येणार आहे.  तसेच दुध, अन्न पदार्थ तपासण्यात यावेत. भेसळीचे प्रमाण निदर्शनास आल्यास तपासणीचे प्रमाण वाढवावे.

  कोरोना विषाणू संसर्ग प्रभाव बघता अन्न पदार्थ विक्रेत्यांनी स्वच्छता पाळावी. उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करू नये. याबाबत विभागाने मोहिम राबवून अन्न पदार्थ तपासावेत. कुठेही अन्न पदार्थांमुळे अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश डॉ शिंगणे यांनी दिले.

Tags: akola newsFood-Drug Testing Laboratory at Washim
Previous Post

Akola Corona Update: आणखी दोघांचा मृत्यू , 29 पॉझिटीव्ह, 118 डिस्चार्ज

Next Post

कोरोना लस : दोन डोसमधील अंतर वाढविण्याची शिफारस केलीच नव्हती, भारतीय वैज्ञानिकांचा धक्कादायक दावा!

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
vaccination

कोरोना लस : दोन डोसमधील अंतर वाढविण्याची शिफारस केलीच नव्हती, भारतीय वैज्ञानिकांचा धक्कादायक दावा!

SBI चे ग्राहक आहात? बातमी वाचलीच पाहिजे!

SBI अलर्ट! काही काळ बंद राहणार 'ही' सेवा; लवकर आटपून घ्या पैशांचे व्यवहार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.