• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, July 5, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं बनावट फेसबुक अकाऊंट बनवत पैशांची मागणी, कनेक्शन राजस्थानपर्यंत!

बनावट फेसबुक अकाऊंट उघडून सर्वसामान्यांना पैशांनी लुटण्याचे प्रकार तर अलिकडे नित्याचेच झाले आहेत. मात्र, सायबर चोरांनी चक्क अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावानेच बनावट अकाऊंट उघडल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे

Team by Team
June 9, 2021
in अकोला, गुन्हा
Reading Time: 1 min read
92 1
0
Collector Akola
34
SHARES
661
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोला : अलिकडे सोशल मीडियावरून फसवणुकीच्या अनेक घटना दररोजच आपल्या कानावर येत असतात. बनावट फेसबुक अकाऊंट उघडून सर्वसामान्यांना पैशांनी लुटण्याचे प्रकार तर अलिकडे नित्याचेच झाले आहेत. मात्र, सायबर चोरांनी चक्क अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावानेच बनावट अकाऊंट उघडल्याची खळबळजनक बाब आली आहे. यातून लोकांना लुटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या बनावट अकाऊंटवरून अनेकांना पैशांची मागणी केल्या गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र, पैसे मागणी करण्यात आलेल्या लोकांनी लगेच हा प्रकार अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने अनेकांची संभाव्य फसवणूक टळली आहे.

अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. आता अकोला सायबर पोलिसांकडून बनावट अकाऊंट बनवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचा वापर करतांना काळजी घेण्याचं आवाहन जनतेला केलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण :

फेसबुकवर अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचं ‘Jitendra Papalkar’ या नावाने फेसबुक अकाऊंट आहे. याच नावाने फेसबुकवर एक बनावट अकाऊंट हॅकर्सनी खोललं आहे. काल संध्याकाळनंतर अकोल्यातील काही प्रतिष्ठीत मंडळींना या बनावट अकाऊंटवरून ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठविण्यात आल्यात. अकोल्यातील जेष्ठ पत्रकार प्रा. सुभाष गादिया, अकोल्याच्या माजी महापौर अश्विनी हातवळणे यांचा मुलगा अखिलेश यांच्यासह 12 ते 13 लोकांना अशा रिक्वेस्ट पाठविण्यात आल्या आहेत. या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर या अकाऊंटवरून मराठीत चॅटींग सुरू करण्यात आलं. आपण सध्या हॉस्पिटलमध्ये भरती असून आपल्याला अतिशय तातडीने 12 हजार रुपयांची आवश्यकता आहे. हे पैसे लवकरच परत करणार असल्याचं या चॅटींगमध्ये म्हटलं गेलं. पैसे जमा करण्यासाठी ‘गुगल पे’ आणि ‘पेटीएम’चे अकाऊंट नंबरही देण्यात आलेत. हा फसवणुसीचा प्रकार असल्याचे सर्वांच्याच लक्षात आल्याने कुणीच पैशांच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे यात कोणतेच आर्थिक व्यवहार झाले नाहीत. मॅसेज आलेल्या सर्वांनीच आज सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला. अन यातूनच पुढील सुत्र वेगानं पुढे हललीत.

हॅकर्सचे धागेदोरे राजस्थानातील बाडमेरपर्यंत :

या संपूर्ण प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्वात आधी त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या सिव्हील लाईन्स पोलिसांकडे केली. सिव्हिल लाइन्स पोलीसांनी या प्रकरणाचा तपास अकोला पोलिसांच्या सायबर शाखेकडे सोपवला आहे. बनावट अकाऊंट तयार करणाऱ्या हॅकर्सनी यासंदर्भात चॅटींग करतांना गुगल पे’ आणि ‘पेटीएम’चे अकाऊंट नंबर दिले आहेत. यात ‘गुगल पे’साठी 9728937247 हा क्रमांक देण्यात आला आहे. तर ‘पेटीएम’ अकाऊंटसाठी 918059934406 हा क्रमांक देण्यात आला असून त्यासाठी ‘आयएफएससी कोड’ 0123456 हा देण्यात आला आहे. हे दोन्ही क्रमांक राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातून संचालित होत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. अकोला पोलीस या प्रकरणाच्या मुळापर्यंत गेले तर या टोळीच्या माध्यमातून देशभरात सुरू असलेले ऑनलाईन चोरीचे प्रकार थांबू शकतील. अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील जनतेला याबाबत सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.

कशी टाळता येईल ऑनलाईन फसवणूक :

तुम्ही फेसबुक, वाट्सअप, गुगल पे, फोन पे आणि इतर ऑनलाईन पैसे जमा करण्याचे अॅप वापरात असाल तर सावध रहा. कारण, तुम्ही कधीही सायबर चोरांच्या जाळ्यात अडकू शकता. तुम्ही वाट्सअप वापरत असाल तर आपल्या अकाऊंटचं ‘सेटिंग्ज’मध्ये जात ‘टू स्टेप व्हिरीफिकेशन’ करणं अतिशय आवश्यक आहे. यासोबतच तुमचं फेसबुक अकाऊंट सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्ही खालील गोष्टींचं कटाक्षाने पालन केलं पाहिजे.

1) मोबाईल संबंधित सर्व गॅझेट्स वापरतांना आपल्याला यातील संभाव्य धोके, सायबर गुन्हे आणि यासंदर्भातील कायद्याचे ज्ञान असणे अतिशय आवश्यक आहे.

2) फेसबुक वापरतांना ‘सेटींग्ज’मध्ये जावून ‘टू फॅक्टर ऑथेंटिकेशन’ आणि ‘प्रोफाईल व्हेरीफिकेशन’ करणं अंत्यत आवश्यक आहे.

3) यासोबतच ‘सेटींग्ज’मध्ये जावून आपलं प्रोफाईल लॉक केलं तर आपलं अकाऊंट फक्त आपल्या मित्र यादीतील लोकांनाच पाहता येतं. अनोळखी लोकांना ते पाहता येणार नाही.

4) आपला युजर पासवर्ड हा वारंवार बदलत राहिले पाहिजे.

5) अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नका.

सोशल मीडिया हा दुधारी तलवारीसारखा आहे. त्याचे जेव्हढे फायदे आहेत, तेव्हढेच त्याचे तोटेही अशा घटना लक्षात आणून देतात. त्यामुळे सोशल मीडिया वापरतांना तुम्ही चौकस असणं असंच आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या ओळखीच्या व्यक्ती किंवा मित्रानं असे ऑनलाईन पैसे मागितले तर आधी शाहनिशा करा. नाही तर क्षणार्धात तुम्ही लुटले जाल

Tags: Akola collectorakola newsAkola news in MarathiDistrict collector Jitendra PapalkarFake FB Account
Previous Post

SSC GD Constable Recruitment 2021:दहावी पास असणाऱ्यांसाठी एसएससी जीडी कॉन्स्टेबल पदाची भरती

Next Post

Crime News : गळा आवळून सुनेनं केला सासूचा खून; मुलाच्या संशयानं हत्येचा उलगडा, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
crime news

Crime News : गळा आवळून सुनेनं केला सासूचा खून; मुलाच्या संशयानं हत्येचा उलगडा, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

homeguard Police

अकोला : जिल्हात ५० पेक्षा जास्त वय असलेले होमगार्ड झाले बेरोजगार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.